Birthday Special : ऐ जिंदगी गले लगा ले... गुलजारांची दहा अजरामर गाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 01:15 PM2018-08-17T13:15:06+5:302018-08-17T13:25:31+5:30

संपूर्न सिंह कालरा हे गुलजार यांचं खरं नाव क्वचितच कुणाला माहीत असेल. कारण त्यांचं हे नाव कधीही फार घेतलं गेलं नाही. आणि ते केवळ गुलजार म्हणून घराघरात पोहोचले.

Birthday Special: 10 of Gulzar's best songs | Birthday Special : ऐ जिंदगी गले लगा ले... गुलजारांची दहा अजरामर गाणी

Birthday Special : ऐ जिंदगी गले लगा ले... गुलजारांची दहा अजरामर गाणी

googlenewsNext

संपूर्न सिंह कालरा हे गुलजार यांचं खरं नाव क्वचितच कुणाला माहीत असेल. कारण त्यांचं हे नाव कधीही फार घेतलं गेलं नाही. आणि ते केवळ गुलजार म्हणून घराघरात पोहोचले. गुलजार यांचे शब्दांची जादू काय आहे हे कुणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. केवळ प्रेमच नाही तर जीवनाचा आणि जगण्याचा सार त्यांनी आपल्या कविता-गजलमधून रेखाटला आहे. त्यांची गाणी आजही श्रोत्यांच्या मनात घर करुन आहे. केवळ जुनी गाणीच नाही तर त्यांची नवीन गाणीही तितकीच मनाचा ठाव घेणारी आहे. ऐकूयात त्यांची काही खास गाणी.....

१) मोरा गोरा अंग 

कृष्ण आणि राधा यांच्यातील प्रेम दाखवणारं हे बंदीनी सिनेमातील असून हे गुलजार यांनी सिनेमासाठी लिहिलेलं पहिलं गाणं आहे. 

२) ऐ जिंदगी गले लगा ले

'सदमा' या सिनेमातील हे गाणं कुणी ऐकलं नसेल असे क्वचितच मिळतील. या गाण्याचे आजही अनेकांना पाठ असतील.

३) तेरे बिना जिंदगी से कोई

'आंधी' सिनेमातील हे गाणं गुलजार यांच्या सर्वात जास्त लोकप्रिय गाण्यांपैकी एक मानलं जातं. 

4) आनेवाला पल जानेवाला है

जुन्या 'गोलमाल' सिनेमाचा उल्लेख हा या गाण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कारण हा सिनेमा कथा, अभिनय सगळ्यांसोबतच या गाण्यामुळेही लोकप्रिय आहे. 

५) तुझसे नाराज नहीं जिंदगी

मासूम सिनेमातील हे गाणं गुलजार यांच्या अनेक एव्हरग्रीन गाण्यांपैकी एक आहे.

६) मुसाफिर हूं यारो

जितेंद्र यांच्यावर चित्रित केलेलं हे परिचय सिनेमातील गाणं त्यांच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या क्लासिक गाण्यांपैकी एक आहे.

८) जय हो

गुलजार यांच्या 'जय हो' या गाण्याने काय जादू केली होती हे सर्वांनाच माहीत आहे. या गाण्यासाठी त्यांना अकॅडमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

९) आपकी ऑंखों मे कुछ

घर या सिनेमातील गाण्याने रेखाला एक वेगळीच ओळख दिली होती. कारण या गाण्याचे बोल आणि रेखाचं सौंदर्य मिळतं जुळतं झालं. 

१०) नैनो की मत सुनियो रे

ओंकारा या सिनेमातील हे गाणं लोकप्रियतेच्या वेगळ्या शिखरावर आहे. 
 

Web Title: Birthday Special: 10 of Gulzar's best songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.