‘या’ कारणामुळे कार्तिकसोबत एन्जॉय करते बाईक राईड; साराचा खुलासा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 06:00 PM2019-07-28T18:00:13+5:302019-07-28T18:38:39+5:30

हँडसम अभिनेता कार्तिक आर्यन आणि गॉर्जिअस अभिनेत्री सारा अली खान हिच्याकडे पाहिले जाते. सध्या हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे सुत्रांकडून कळतेय. एकमेकांसोबत बाईक राईड करतानाही ते अनेकदा दिसतात.

Bike ride with Karthik because of 'this' factor; Sara Revealed ! | ‘या’ कारणामुळे कार्तिकसोबत एन्जॉय करते बाईक राईड; साराचा खुलासा!

‘या’ कारणामुळे कार्तिकसोबत एन्जॉय करते बाईक राईड; साराचा खुलासा!

googlenewsNext

बॉलिवूडचे सध्याचे मोस्ट लव्हेबल कपल म्हणून हँडसम अभिनेता कार्तिक आर्यन आणि गॉर्जिअस अभिनेत्री सारा अली खान हिच्याकडे पाहिले जाते. सध्या हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे सुत्रांकडून कळतेय. एकमेकांसोबत बाईक राईड करतानाही ते अनेकदा दिसतात. ते सध्या ‘लव्ह आज कल २’ या चित्रपटाचे शूटिंग करत असून एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसतात. नुकताच साराने ती कार्तिकसोबत बाईक राईड का करते याचा  खुलासा केला आहे.                                       

बॉलिवूडच्या पतौडी खानदानाची वारस सारा अली खान हिने नुकताच एक खुलासा केला आहे. तिला कार्तिकसोबत वेळ घालवायला आवडते, हे तिने अनेकदा चाहत्यांसोबत शेअर केले आहे. मात्र ती अनेकदा कार्तिकसोबत बाईक राईड करतानाही दिसते. याचे कारण तिला विचारण्यात आले असता तिने खुलासा केला की,‘ जर मला त्याच्या बाईकच्या मागील सीटवर बसून पैसे मिळत असतील तर कोणतीही अभिनेत्री हे करायला लगेच तयार होईल,’ असे तिने म्हटले आहे. 

अलीकडेच साराचा एका फॅशन शोमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओत ती रॅम्पवॉक करत असताना समोर कार्तिक आर्यन आणि तिचा भाऊ इब्राहिम देखील बसलेले दिसत आहेत. ते तिला चिअर अप करताना दिसत असून सारा देखील कार्तिककडे बघत बघत पोझेस देताना दिसते आहे.                                 

Web Title: Bike ride with Karthik because of 'this' factor; Sara Revealed !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.