काय सपना चौधरीने गुपचूप उरकला सारखरपुडा? या ‘मिस्ट्री मॅन’सोबत लवकरच बांधणार लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 01:38 PM2020-03-16T13:38:01+5:302020-03-16T16:04:27+5:30

कोण आहे सपनाच्या आयुष्यातील मिस्ट्री मॅन?

bigg boss fame sapna choudhary secret engagement going to marry soon-ram | काय सपना चौधरीने गुपचूप उरकला सारखरपुडा? या ‘मिस्ट्री मॅन’सोबत लवकरच बांधणार लग्नगाठ

काय सपना चौधरीने गुपचूप उरकला सारखरपुडा? या ‘मिस्ट्री मॅन’सोबत लवकरच बांधणार लग्नगाठ

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांत सपना व वीर अनेकदा एकत्र स्पॉट झालेत.

हरियाणाची स्टार डान्सर आणि ‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक सपना चौधरी हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी सपना लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. आता सपना चौधरीचा हा होणारा पती कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तेव्हा जाणून घेऊ यात...
चर्चा खरी मानाल तर सपना चौधरी हरियाणाच्या वीर साहूला डेट करतेय. वीराला हरियाणाचा ‘बब्बू मान’ म्हणून ओळखले जाते. वीर अभिनेता व गायक दोन्ही आहे. त्याचे अनेक म्युझिक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.


सध्या वीर आणि सपनाच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचेही मानले जात आहे. एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सपना वीरचे कौतुक करताना दिसली होती.

‘वीर स्वच्छ मनाचा माणूस आहे. 2015-16 मध्ये एका अवार्ड शोमध्ये आमची पहिली भेट झाली होती. पहिल्यांदा त्याला पाहिल्यावर तो प्रचंड गर्विष्ठ असल्याचे मला वाटले होते. यानंतर आम्ही पुन्हा एका अवार्ड शोमध्ये भेटलो. पण गर्दी जास्त असल्याने आम्ही एकमेकांशी बोलू शकलो नव्हतो. तिस-या भेटीत आम्ही एकमेकांशी बोललो,’असे सपनाने सांगितले होते.
या भेटीनंतर सपना व वीर यांच्यात सतत बोलणे सुरू झाले. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

केला सीक्रेट साखरपुडा?

सपना व वीरने गुपचूप साखरपुडा केल्याचे म्हटले जात आहे. अर्थात सपना वा वीर या दोघांपैकी कुणीही यावर बोलायला तयार नाही. पण दोघांमध्ये काहीतरी खिचडी शिजतेय इतके मात्र नक्की. अलीकडे एका मुलाखतीत वीर सपनाबद्दल बोलला होता. ‘सपना चौधरी माझ्यासाठी ‘सपना’ नाही,’ असे तो म्हणाला होता. यावरून दोघांच्या लग्नात कुठलीही अडचण नाही, असा अंदाज काढला गेला. गेल्या काही दिवसांत सपना व वीर अनेकदा एकत्र स्पॉट झालेत.

Web Title: bigg boss fame sapna choudhary secret engagement going to marry soon-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.