lokmat Supervote 2024
Join us

बिग बॉसचा सीझन १३चा आज अंतिम सोहळा पार पडणार आहे आणि या सोहळ्यात या शोच्या विजेत्याचे नाव घोषित केले जाणार आहे. या सीझनमध्ये विजेता कोण होणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. त्यात यंदाच्या सीझनमध्ये बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी सिद्धार्थ शुक्ला व असीम रियाज हे दोघेही स्ट्राँग स्पर्धक मानले जात आहेत. नुकताच फायनलिस्ट स्पर्धकांचा त्याच्या आतापर्यंच्या प्रवासाचा व्हिडीओ दाखवला. पण आता फिनालेला काही तास उरले असतानाच काही पैशांसाठी असिम रियाजनं ही शो सोडल्याचं वृत्त सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 

बिग बॉसच्या फिनानेच्या आधी घरातील प्रत्येक सदस्याला एक ऑफर दिली जाते. ही ऑफर पैशाच्या बॅगेची असते. फिनालेच्या आधी घरातील सदस्यांना ही बॅग घेऊन घरातून बाहेर पडण्याची संधी दिली जाते. ज्यानंतर हा सदस्य फिनालेच्या रेसमधून बाहेर पडतो. अशात यंदाच्या या सीझनमध्ये ही संधी दिली जाणार की नाही? जर दिली ही बॅग कोण घेणार? असे अनेक प्रश्न अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. याबाबतच हे धक्कादायक वृत्त सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे.


मीडिया रिपोर्टनुसार आसिम रियाज ही बॅग घेऊन बाहेर पडणार आहे. फिनालेच्या काही तासांआधीच हे वृत्त समोर आल्यानं सोशल मीडियावरील असीमच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. पण या दरम्यान आसिमने याबाबतचा खुलासा केला आहे. त्याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत हे वृत्त खोटं असल्याचे सांगितले आहे. 


आसिमने ट्विट केले की, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. आसिमनं पैशाची बॅग घेतलेली नाही. हे सर्व फक्त तुम्हाला निराश करण्यासाठी करण्यात आले आहे. आसिमला या शोचा विजेता होण्यासाठी त्याला शेवटपर्यंत व्होट करत राहा.'

Dont believe any rumours that Asim took the money bag. Its just a strategy to demoralize u. Keep voting for our champ and make him the winner! 💪💪#AsimRiazForTheWin

— Asim Riaz (@imrealasim) February 14, 2020

माहिरा शर्मा या शोमधून बाहेर पडल्यानंतर आता घरात फक्त शहनाझ गिल, सिद्धार्थ शुक्ला, पारस छाब्रा असिम रियाज, रश्मी देसाई आणि आरती सिंग एवढेच कंटेस्टंट उरले आहेत. 

Web Title: Bigg Boss 13: This Contestant Releases Show With Fingers Hours Before Finale ?, Fans Get Busy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.