लॉकडाऊनदरम्यान आजारी वडिलांसाठी श्रावणबाळ बनलेल्या ज्योती कुमारीची संघर्षगाथा येणार रूपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 12:37 PM2020-05-28T12:37:27+5:302020-05-28T12:40:09+5:30

आज ज्योतीच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. वडील पासवान यांनी देखील मुलगा आणि मुलगी मध्ये फरक करून नका असा वेळ पडल्यास मुलीदेखील आई-वडिलांचे श्रावण बाळ बनू शकतात, हे ज्योतीने सिद्ध करून दाखवले आहे.

Bicycle Girl Jyoti Kumari struggle to get her father on a bicycle in lockdown on the big Screen-SRJ | लॉकडाऊनदरम्यान आजारी वडिलांसाठी श्रावणबाळ बनलेल्या ज्योती कुमारीची संघर्षगाथा येणार रूपेरी पडद्यावर

लॉकडाऊनदरम्यान आजारी वडिलांसाठी श्रावणबाळ बनलेल्या ज्योती कुमारीची संघर्षगाथा येणार रूपेरी पडद्यावर

googlenewsNext

लॉकडाऊनदरम्यान, आपल्या आजारी वडिलांना सायकलवर घेऊन सुमारे १२०० किमी अंतर कापून गाव गाठणारी ज्योती कुमारी सध्या देशात चर्चेतील चेहरा ठरली आहे. आज प्रत्येकजण ज्योतीच्या त्या धाडसाला, ज्योतीच्या धैर्याला सलाम करत आहे. सगळीकडे कोरोनामुळे सारेच हतबल झाले होते. अखेर मजुरांनी आपल्या गावी जाण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करत आपल्या घरी पोहचले. प्रत्येकाच्या वाट्याला आलेला हा संघर्ष कायमच त्यांच्या आठवणीत राहणार आहे. प्रत्येक मुजराच्या संघर्षाची कहाणी ही वेगेवगळी असली तरी ती वाचून, ऐकून आज प्रत्येकाचे डोळे पाणावलते. यावेळी अनेकांनी माणुसकी जपत मजुरांना मदतीचाही हाथ दिला आहे. अशात ज्योतीने बापासाठी केलेली त्या कामगिरीमुळे सारेच नतमस्तक होत आहेत.

केवळ 15 वर्षांच्या ज्योती कुमारी आपल्या आजारी वडिलांना सायकलवरून घरी घेऊन जात असल्याचे समोर आले होते. वडील मोहन पासवान यांना घेऊन सायकलवरून 7 दिवस तब्बल 1200 किलोमीटरचा प्रवास तिने केला. तिने वडिलांना सायकलवर डबलसीट घेऊन गुरुग्राम ते बिहार असा प्रवास केला. ज्योतीचे वडील ही गुरुग्राममध्ये ई-रिक्षा चालवायचे. मात्र त्याचा अपघात झाला आणि ते जखमी झाले. लॉकडाऊनमध्ये पैसे संपले तसेच घर मालकानंही घर खाली करण्यासाठी दबाव आणला. त्यामुळे तिने सायकलने प्रवास करायचा असं ठरवलं. आजारी वडिलांना घेऊन तिने गुरुग्राममधून सायकलने आपला प्रवास सुरू केला आणि सात दिवसांनी ते त्यांच्या घरी सुखरुप पोहोचले. आजारी वडिलांसाठी श्रावण बाळ बनलेल्या ज्योतीचं आयुष्य त्या प्रसंगानं बदललं. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ओंकार सिंग यांनी ज्योतीला सिलेक्शन ट्रायलसाठी बोलावलं आहे. ज्योती आठवीत आहे आणि तिनं हे ट्रायल पास केल्यास तिची राष्ट्रीय सायकलिंग अकादमीत सराव करण्यास निवड होणार, असल्याचे सिंग यांनी सांगितले.

इतकेच नाहीतर ज्योती कुमारीचे शौर्यगाथा आता रूपेरी पडद्यावरही झळकणार आहे. होय,  ज्योतीच्या आयुष्यावर लवकरच सिनेमा बनवणार असल्याता घाट निर्मात्यांनी घातला आहे. वडील मोहन पासवान यांच्याकडूनही यासाठी परवानगी मिळाली असून, रीतसर करार देखील झाला आहे. आज ज्योतीच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. वडील पासवान यांनी देखील मुलगा आणि मुलगी मध्ये फरक करून नका असा वेळ पडल्यास मुलीदेखील आई-वडिलांचे श्रावण बाळ बनू शकतात, हे ज्योतीने सिद्ध करून दाखवले असल्याचे सांगत आनंदाने त्यांचा ऊर अभिमानाने भरून येत होता.

Web Title: Bicycle Girl Jyoti Kumari struggle to get her father on a bicycle in lockdown on the big Screen-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.