Birthday Special: भूमिका चावलाला नशीबाने मिळाली होती ‘निर्जला’ची भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 10:55 AM2019-08-21T10:55:51+5:302019-08-21T10:59:37+5:30

सन 2003 मध्ये प्रदर्शित सलमान खान स्टारर ‘तेरे नाम’ या चित्रपटातील निर्जला आठवते? राधे नावाचा कॉलेजमधला एक टपोरी युवक आणि साधी सरळ निर्जला यांची ही लव्हस्टोरी तुफान गाजली होती. अभिनेत्री भूमिका चावलाने या चित्रपटात निर्जलाची भूमिका साकारली होती.

bhumika chawla birthday special know about her personal life | Birthday Special: भूमिका चावलाला नशीबाने मिळाली होती ‘निर्जला’ची भूमिका 

Birthday Special: भूमिका चावलाला नशीबाने मिळाली होती ‘निर्जला’ची भूमिका 

googlenewsNext
ठळक मुद्दे2016 मध्ये आलेल्या ‘धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ मध्ये भूमिका अखेरची दिसली होती.

सन 2003 मध्ये प्रदर्शित सलमान खान स्टारर ‘तेरे नाम’ या चित्रपटातील निर्जला आठवते? राधे नावाचा कॉलेजमधला एक टपोरी युवक आणि साधी सरळ  निर्जला यांची ही लव्हस्टोरी तुफान गाजली होती. अभिनेत्री भूमिका चावलाने या चित्रपटात  निर्जलाची भूमिका साकारली होती. भूमिका चावला केवळ याच भूमिकेसाठी जन्माला आली होती की काय, अशी शंका यावी इतपत तिने ही भूमिका जिवंत केली होती. आज याच  निर्जलाचा अर्थात भूमिका चावलाचा वाढदिवस.


 21 ऑगस्ट  1978 रोजी दिल्लीमध्ये तिचा जन्म झाला. तिने 2000 मध्ये  ‘युवाकुडु’ या तेलगू चित्रपटातून तिने अभिनयाची सुरुवात केली आणि यानंतर अचानक बॉलिवूडमध्ये  झळकली. बॉलिवूडच्या पहिल्याच चित्रपटात तिला सलमानसोबत काम करण्याची संधी मिळाली. ‘तेरे नाम’ सुपरडुपर हिट झाला. सलमान, या चित्रपटात संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमिया अशा सगळ्यांना या चित्रपटाचा फायदा झाला. अपवाद तो भूमिकाचा. कारण या चित्रपटानंतरही भूमिकाला म्हणावे तसे यश लाभले नाहीत.

लोक समजत जुही चावलाची बहीण


भूमिका बॉलिवूडमध्ये आली तेव्हा अनेकांनी तिला जुही चावलाची बहीण समजले. कारण तिचे चावला हे आडनाव. भूमिकाचे आडनाव खरे होते. पण भूमिका हे नाव मात्र तिचे खरे नाव नाही.  भूमिकाचे खरे नाव रचना असे आहे. तिला घरात प्रेमाने गुडिया नावाने हाक मारायचे. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी तिने आपले नाव बदलले.

‘तेरे नाम’ मिळाला नशीबाने


‘तेरे नाम’ या चित्रपटाने भूमिकाला एक नवी ओळख दिली. पण खरे सांगायचे तर या चित्रपटासाठी ती पहिली पसंत नव्हती. ‘तेरे नाम’मधील  निर्जलाची भूमिका आधी अभिनेत्री अमिषा पटेल करणार होती. पण नशीबाने ही भूमिका भूमिकाला मिळाली आणि तिने या भूमिकेत जीव ओतला.

योगा टीचरवर भाळली


भूमिकाने 2007 मध्ये भूमिकाने योगा टीचर भरत ठाकुरसोबत लग्न केले. लग्नापूर्वी हे दोघे चार वर्षे एकमेकांना डेट करत होते. भूमिका भरतकडे योगा शिकायची. यादरम्यान  दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांत प्रेमात झाले. 21 ऑक्टोबर, 2007 मध्ये देवळाली (नाशिक)च्या एका गुरुव्दारात दोघांनी लग्न केले. लग्नाच्या 7 वर्षांनंतर भूमिकाने एका मुलाला जन्म दिला. 

 2016 मध्ये आलेल्या ‘धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ मध्ये भूमिका अखेरची दिसली होती. यामध्ये तिने धोनीच्या बहिणीची भूमिका साकारली होती. भूमिका आता चित्रपटांपासून दूर आहे आणि आपल्या कुटूंबात व्यस्त आहे.
 
 

Web Title: bhumika chawla birthday special know about her personal life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.