विकी कौशलच्या 'मिस्टर लेले'मध्ये झाली भूमी पेडणेकरची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 08:14 PM2021-03-10T20:14:26+5:302021-03-10T20:15:07+5:30

भूमी पेडणेकरने नुकतेच तिचा आगामी चित्रपट 'बधाई दो'चे शूटिंग पूर्ण केले आहे आणि ती आपल्या आगामी सिनेमाच्या तयारीला लागली आहे.

Bhumi Pednekar's entry in Vicky Kaushal's 'Mr. Lele' | विकी कौशलच्या 'मिस्टर लेले'मध्ये झाली भूमी पेडणेकरची एन्ट्री

विकी कौशलच्या 'मिस्टर लेले'मध्ये झाली भूमी पेडणेकरची एन्ट्री

googlenewsNext

भूमी पेडणेकरने नुकतेच तिचा आगामी चित्रपट 'बधाई दो'चे शूटिंग पूर्ण केले  आहे आणि ती आपल्या आगामी सिनेमाच्या तयारीला लागली आहे. शशांक खेतानच्या 'मिस्टर लेले'मध्ये तिची एन्ट्री होणार असल्याचे समजते आहे. भूमीच्या व्यतिरिक्‍त 'मिस्टर लेले'मध्ये विकी कौशल आणि कियारा आडवाणीही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'मिस्टर लेले' हा एक कॉमेडी सिनेमा असणार आहे. विकी कौशलला प्रथमच पडद्यावर कॉमेडी करताना प्रेक्षक बघणार आहेत.

'मिस्टर लेले' चित्रपटात विकी कौशल महाराष्ट्रीयन व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. तर भूमी आणि कियाराच्या भूमिकेबद्दल अद्याप समजू शकलेले नाही. यापूर्वी विकी आणि कियारा 'लस्ट स्टोरीज'मध्ये एकत्र होते. पण यांच्या आगोदर वरुण धवन आणि जान्हवी कपूरची या रोलसाठी निवड झाली होती. मात्र प्रोड्युसर करण जोहरने काय विचार केला कोणास ठाऊक आणि वरुण आणि जान्हवी दोघेही सिनेमातून आऊट झाले आणि विकी-कियारा जोडीची वर्णी लागली.


'मिस्टर लेले' मध्ये या जोडीमध्ये भूमी पेडणेकरचा रोल कसा असेल, हे लवकरच समजेल. पण बऱ्याच दिवसांनी कॉमेडी सिनेमा करायला मिळाल्यामुळे ती देखील उत्साही आहे. विकी कौशल आणि भूमी पेडणेकरने देखील यापूर्वी भूत या सिनेमात एकत्र काम केले आहे. मात्र भूमी आणि कियारा पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे या तिघांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर अनुभवणे, औत्सुकतेचे ठरणार आहे.

तिने दम लगा के हईशा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटातील भूमिकेतून तिला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर शुभ मंगल सावधान, टॉयलेट एक प्रेमकथा, सोन चिडिया, सांड का आँख व पति पत्नी और वो यासारख्या चित्रपटातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.

Web Title: Bhumi Pednekar's entry in Vicky Kaushal's 'Mr. Lele'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.