ठळक मुद्देतापसी व भूमी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन आणि कथा तुषार हिरानंदानी करणार आहे

भूमी पेडणेकर सध्या 'सांड की आँख' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.  या सिनेमात कराव्या लागणाऱ्या प्रास्थेटिक मेकअपमुळे भूमीच्या चेहऱ्यावर काळे चट्टे आले आहेत. मात्र चेहरा खराब झाल्यानंतर भूमीने आपल्या कामाप्रती कमिटमेंट दाखवत तिने शूटिंग सुरु ठेवले कारण दिग्दर्शक आणि निर्मात्याची गैरसोय होऊ नये म्हणून तिने शूटिंग केले. भूमीला हा मेकअप करण्यासाठी जवळपास तीन तास लागतात. उत्तरप्रेदशच्या कडक उन्हामध्ये जवळपास त्यांना आठ तास रोज शूटिंग करावं लागतेय. धुळ आणि कडक उन्हामुळे भूमीची स्किन जळायला लागली आहे. 

'सांड की आँख'  जगातील एका वयस्कर शार्पशूटर महिलेवर या सिनेमाची कथा आधारीत असून या महिलेच्या भूमिकेत तापसी दिसणार आहे.या सिनेमाचे दिग्दर्शन आणि कथा तुषार हिरानंदानी यांची असणार असून अनुराग कश्यप आणि निधी परमार याची निर्मिती करणार आहेत.


भूमिने सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाले तेव्हा लिहिले हो,  'ही भूमिका आतापर्यंतची सर्वात कठीण आणि प्रेरणादायी भूमिकेपैकी एक आहे.' 'सांड की आँख' चित्रपटात भूमी व तापसी यांच्यासोबत प्रकाश झा आणि विनित सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 तापसी व भूमी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे एका वेगळ्या भूमिकेत त्यांना रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे. याशिवाय सुद्धा भूमीला सिनेमांची लॉटरी लागली आहे. 'सांड की आँख'शिवाय ती पती पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये सुद्धा दिसणार आहे. यात भूमीशिवाय अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यन लीड रोलमध्ये आहे. मुदस्सर अजीज दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी ६ डिसेंबरला रिलीज होतोय. 


Web Title: Bhumi pednekar shoots despite severe blisters on her face!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.