आपली फिल्म ‘हाऊसफुल-4’च्यामुळे बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार स्कोर ट्रेंड्स इंडिया लोकप्रियता चार्टवर सर्वोच्च स्थानावर आहे. तर ‘सांड की आंख’ चित्रपटामुळे प्रतिभावान अभिनेत्री भूमी पेडणेकर अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.


‘सांड की आंख’ चित्रपटातल्या अभिनयामुळे भूमी पेडणेकर बॉलीवूड अभिनेत्रींच्या यादीत लोकप्रियतेत पहिल्या क्रमांकावर गेली. 53 गुणांसह नंबर वन स्थानावर असलेल्या भूमीची सहकलाकार आणि ह्या चित्रपटातली दूसरी ‘शूटर दादी’ म्हणजेच अभिनेत्री तापसी पन्नू 47 गुणांसह दुस-या स्थानावर आहे.
लोकप्रिय अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये अनुष्का शर्मा तिस-या स्थानावर तर प्रियंका चोप्रा चौथ्या स्थानावर आहे. अनुष्काचे तिचा पती क्रिकेटर विराट कोहलीसोबतचे फोटो तर प्रियंकाचे तिचा पती निक जोनाससोबतचे फोटो सध्या सोशल मिडीया आणि वायरल न्यूजमध्ये खूप गाजत असल्याने दोघीही तिस-या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.


बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन आपल्या लोकप्रिय गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) च्यामूळे तिस-या क्रमांकावर आहेत. सुपरस्टार सलमान खान मात्र आश्चर्यकारकपणे सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. आपल्या आगामी दबंग 3 आणि राधे ह्या सिनेमांच्या घोषणेनंतर सलमान खान चौथ्या स्थानावर आहे.


स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नूची फिल्म ‘सांड की आंखं’मधील त्यांच्या अभिनयासाठी दोघींचेही खूप कौतुक झाले. आणि म्हणूनच दोन्ही प्रतिभावान अभिनेत्रींच्या लोकप्रियतेत वाढ झालेली दिसून येतेय.“


अश्वनी कौल पूढे सांगतात, "आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंगपर्यंत पोहोचू शकतो.”

Web Title: Bhumi pednekar become a no 1 on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.