‘या’ आजाराने ग्रस्त आहे ही अभिनेत्री, सतत वाढतेय वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 03:02 PM2019-09-09T15:02:29+5:302019-09-09T15:03:36+5:30

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती जिममध्ये जाते, डाएटही पाळते. पण दिवसागणिक तिचे वजन वाढत आहे.

bhojpuri actress kajal raghwani suffering from pcod polycystic ovary syndrome | ‘या’ आजाराने ग्रस्त आहे ही अभिनेत्री, सतत वाढतेय वजन

‘या’ आजाराने ग्रस्त आहे ही अभिनेत्री, सतत वाढतेय वजन

googlenewsNext
ठळक मुद्देकाजलने हुकूमत, पंचायत, मेहंदी लगा के रखना, चीरहरण अशा अनेक भोजपुरी सिनेमांत काम केले आहे.

भोजपुरी अभिनेत्री काजल राघवानी सध्या एका आजाराने ग्रस्त आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी काजल जिममध्ये घाम गाळते, डाएटही पाळते. पण दिवसागणिक तिचे वजन वाढत आहे. याला कारण म्हणजे, काजलला पीसीओडी हा आजार आहे. यामुळे तिचे वजन कायम वाढत आहे.
पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. हा अंडाशयाशी निगडीत आजार आहे. या आजारात स्त्री बीजकोषात अनेक गाठी तयार होतात. यामुळे हॉर्मोन्सचे संतुलन बिघडते. आजकाल अनेक तरूणी या आजाराने ग्रस्त आहेत. काजलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत, या आजाराबद्दल सांगितले आहे.

‘ I AM NOT 👉 OVARY 👈 REACTING. मी गेल्या दीड वर्षांपासून या आजाराने ग्रस्त आहे. सारी लक्षणे मला दिसत आहेत. त्यात लाज बाळगण्यासारखे वा लपवण्यासारखे काहीही नाही,’ असे तिने लिहिले आहे. काजलने एक फोटोही पोस्ट केला आहे. यात या आजाराच्या अनेक लक्षणांबदद्ल लिहिलेले आहे.


काजलने ही पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी कमेंट्स करणे सुरु केले. अनेकांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला. अनेकांनी ती लवकर बरी व्हावी, अशी कामना केली.
या आजारावर कुठलाही उपचार नाही. केवळ योग्य दिनचर्या आणि आहार याच जोरावर हा आजार आटोक्यात ठेवता येतो.


काजलने हुकूमत, पंचायत, मेहंदी लगा के रखना, चीरहरण अशा अनेक भोजपुरी सिनेमांत काम केले आहे. काजल ही भोजपुरी सिनेमाच्या चार टॉप मोस्ट अ‍ॅक्ट्रेसपैकी एक आहे. तिच्या डान्सचे असंख्य चाहते आहेत. युट्यूबवर सर्वाधिक पाहिले गेलेले ‘छलकता हमरो जवानिया राजा’ हे गाणे काजलवर चित्रीत केले गेले आहे.

Web Title: bhojpuri actress kajal raghwani suffering from pcod polycystic ovary syndrome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cinemaसिनेमा