ठळक मुद्दे२०१९ मध्ये सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट हा विकी कौशलचा उरीः द सर्जिकल स्ट्राईक हा असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३३६.९७ करोड इतकी कमाई केली होती.

सलमान खान आणि कतरिना कैफची मुख्य भूमिका असलेला भारत हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची कथा तर प्रेक्षकांना आवडत आहे. पण त्याचसोबत या चित्रपटात सलमान आणि कतरिना यांनी खूप चांगला अभिनय केला असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. तसेच या चित्रपटातील सलमान आणि कतरिनाच्या केमिस्ट्रीची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. सलमानच्या या चित्रपटाला खूप चांगले ओपनिंग मिळाले होते त्याबाबत त्याने आपल्या फॅन्सचे ट्वीटरद्वारे आभार देखील मानले होते. 

भारत हा चित्रपट प्रदर्शित होऊन केवळ पाचच दिवस झाले आहेत. पण या पाच दिवसांत भारत या चित्रपटाने जगभरात २३८.२६ करोड रुपयांचा गल्ला जमवला आहे. भारत या चित्रपटाने खूपच कमी दिवसांत खूप चांगला व्यवसाय केला असल्याने या चित्रपटाचे चांगलेच कौतुक होत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, भारत या चित्रपटाने इतकी चांगली कमाई करूनही हा चित्रपट २०१९ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा पहिला नव्हे तर दुसरा चित्रपट आहे. 

२०१९ मध्ये सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट हा विकी कौशलचाउरीः द सर्जिकल स्ट्राईक हा असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३३६.९७ करोड इतकी कमाई केली होती. २०१९च्या चित्रपटांमध्ये गली बॉयने २३७.३५ करोड, टोटल धमालने २२६.२८ करोड, केसरीने २०४.८२ करोड, कलंकने १४२.१५ करोड, बदलाने १३८.४९ करोड आणि दे दे प्यार देने १३३.३८ करोड इतकी कमाई केली आहे.

भारत प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि सलमानला चांगलाच धक्का बसला होता. कारण सलमानचा भारत हा चित्रपट दुसऱ्याच दिवशी ऑनलाईक लीक झाला होता. तामीळ रॉकर्सने हा चित्रपट लीक केला असून या गोष्टीमुळे चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होऊ शकतो असा अंदाज त्याचवेळी वर्तवण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांपासून चित्रपटाचे कलेक्शन कमी झाले असून हा चित्रपट उरी इतका व्यवसाय करेल का याची सलमानचे फॅन्स वाट पाहात आहेत. 


Web Title: Bharat grosses 238 cr. worldwide; becomes the 2nd highest worldwide grosser of 2019 after Uri – The Surgical Strike
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.