तैमुरमुळे 'या' अभिनेत्याचा मुलगा आला प्रकाशझोतात, 3 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला हा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 12:55 PM2020-02-20T12:55:12+5:302020-02-20T12:57:58+5:30

अरहानची ओळख समजताच हा मलायता अरबाजचा मुलगा असल्याचे आता कुठे रसिकांना कळतंय.

Because Of Taimur Ali Khan Malaika Arora Son Arhaan Khan Came in Limelight | तैमुरमुळे 'या' अभिनेत्याचा मुलगा आला प्रकाशझोतात, 3 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला हा फोटो

तैमुरमुळे 'या' अभिनेत्याचा मुलगा आला प्रकाशझोतात, 3 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला हा फोटो

googlenewsNext

करीनाचा लेक तैमुर अली खान माध्यमांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.  त्याच्या जन्मापासूनच तैमुरची बॉलीवुड आणि मीडियामध्ये चर्चा असते. तैमुरची कोणतीही गोष्ट लगेच बातमी बनते. मात्र आता तैमुरमुळेच आणखीन एक स्टारकिड सध्या प्रकाशझोतात आला आहे. बॉलिवूडची मुन्नी अर्थात मलायका अरोरा आणि अरबाज खानचा मुलगा अरहान. सोशल मीडियावर अरहान हा तैमुरसोबत फोटोत दिसतोय. यावर मलायकानेही समर्पक कॅप्शनही दिली आहे.


सोशल मीडियावर तैमुरचा फोटो दिसताच त्याला लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होणार हे मात्र नक्की. त्यामुळे फोटोत दिसणारा मुलगा कोण असाही प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. अरहानची ओळख समजताच हा मलायता अरबाजचा मुलगा असल्याचे आता कुठे रसिकांना कळतंय. त्यामुळे कुठे ना कुठे अरहानला प्रकाशझोतात यायला तैमुरच कारणीभूत ठरला आहे. 

अरबाजसह  मलायकाचे नाते संपले असले तरी मुलासह मात्र तिचे नाते आजही तसेच आहे. अरहानला अर्जुनसोबतच्या नात्याविषयी माहित असून तोही यासाठी खुश आहे. माझा मुलगा अरहान नेहमीच माझी पहिली प्रयोरिटी आहे. तो मला खूप समजून घेतो आणि पाठिंबा देतो. मला याची खूप गरज होती. त्याच्यासाठी माझा आनंद आणि माझ्यासाठी त्याचा आनंद नेहमीच सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. मला घडवण्यात अरहानची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे मलायकाने सांगितले.

Web Title: Because Of Taimur Ali Khan Malaika Arora Son Arhaan Khan Came in Limelight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taimurतैमुर