अभिनेता बॉबी देओल ५१ वर्षांचा झाला आहे. त्याचा जन्म २७ जानेवारी १९६७ मध्ये मुंबई येथे झाला असून, बºयाचशा चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्याला इंडस्ट्रीत ओळख निर्माण करता आली. सध्या बॉबी त्याच्या आगामी ‘रेस-३’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आज आम्ही तुम्हाला बॉबीच्या खºयाखुºया आयुष्यातील लव्हस्टोरीबद्दल सांगणार आहोत. होय, बॉबीच्या पत्नीचे नाव तान्या असून, बॉबी आणि तिची प्रेम कहाणी खूपच रोमॅण्टिक आहे. वास्तविक या दोघांची भेट कुठल्या चित्रपटाच्या सेटवर झाली नाही तर चक्क एका रेस्टॉरंटमध्ये झाली होती. त्याचे झाले असे की, बॉबी आपल्या मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये बसून चहा पित होता. त्याठिकाणी तान्याही बसलेली होती. बॉबीने जेव्हा तान्याला बघितले तेव्हा पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. पुढे बॉबीने लगेचच तान्याबद्दलची माहिती काढली. हळूहळू त्यांच्यात बोलणे सुरू झाले. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठीही व्हायला लागल्या. त्यानंतर एकेदिवशी बॉबी तान्याला त्याच्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला ज्याठिकाणी त्याने पहिल्यांदा तिला बघितले होते. तिथेच त्याने तिला प्रपोज केले. पुढे दोघांचेही परिवारातील लोक एकमेकांना भेटले अन् त्यांच्यात लग्नाची बोलणी सुरू झाली.  बॉबीचे वडील अभिनेते धर्मेंद्र यांना तान्या खूपच पसंत पडली. त्यामुळे त्यांनी लगेचच ‘चट मंगनी, पट ब्याह’ उरकून टाकण्याचा निर्णय घेतला. अशापद्धतीने १९९६ मध्ये तान्या आणि बॉबीने साताजन्माच्या गाठी बांधल्या. तान्या एका मोठ्या उद्योगपती घराण्यातून आहे. त्यांचा खूप मोठा फर्निचर आणि होम डेकोरेशनचा ‘द गुड अर्थ’ या नावाने बिझनेस आहे. शिवाय तान्या डिझायनर म्हणून आजही काम करीत आहे. याविषयी ती सांगते की, बॉबी माझ्या कामात कधीच लुडबूड करीत नाही. उलट चांगले कामाचे बॉबी आणि सनी माझे कौतुक करतात. 

तान्या ग्लॅमर जगतापासून नेहमीच दूर राहिली आहे. त्यामुळे ती बॉलिवूड पार्ट्यांमध्ये खूपच कमी वेळा बघावयास मिळते. मात्र संजय कपूरची पत्नी महिप आणि सोहेल खानची पत्नी सीमा तिच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. बॉबी आणि तान्याचे वैवाहिक जीवन खूपच आनंदी आहे. या दाम्पत्याला आर्यमान आणि धरम नावाची दोन मुले आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: B'day Special: Tea father father falls in love with Tani Bobby Deol; Read his love story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.