बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा बजरंगी भाईजान १७ जुलैला प्रदर्शित होऊन चार वर्ष पूर्ण झाले. या चित्रपटाचा बजेट नव्वद कोटी होते आणि या चित्रपटाने जवळपास ९७० कोटींची कमाई केली होती. या चित्रपटातील फक्त सलमानचा बजरंगी अंदाजच नाही तर मुन्नीदेखील प्रेक्षकांना भावली होती. पाकिस्तानात जाऊन सलमान मुन्नीच्या आई वडिलांना भेटवणार हे कथानक रसिकांना खूपच आवडलं.  

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, बजरंगी भाईजान चित्रपटाच्या शूटिंग आधी जेव्हा हर्षाली सलमान खानला भेटली तेव्हा तिने सलमानला एक प्रश्न विचारला होता. हर्षालीनं सलमानला विचारलं होतं की, तुम्ही मला सुपरस्टार बनवाल का?  त्यावेळी सलमानला वाटलं की हर्षालीच्या पालकांनी तिला हे शिकवलं आहे. मात्र नंतर सलमानला या गोष्टीची जाणीव झाली की ते शब्द हर्षालीचेच होते. 


बजरंगी भाईजानच्या सेटवर हर्षाली रिकाम्या वेळेत सलमान खान व कबीर खान यांच्या मोबाईलमध्ये बार्बीवाले गेम्स खेळायची. तसेच सलमान खानसोबत टेबल टेनिस खेळायची.


सूत्रांच्या माहितीनुसार, बजरंगी भाईजान चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हर्षाली नेहमी रडायची. असं तेव्हा घडायचं जेव्हा ती सलमान खानला फायटिंग सीन किंवा इमोशनल सीन करताना पहायची.


हर्षालीच्या आईनं मुलाखतीत सांगितलं की, सुरूवातीला हर्षाली सलमान खानसोबत बोलताना खूप लाजत होती. काही कालावधीनंतर सलमानसोबत मिळून मिसळून वागू लागली होती. सलमानचे तिच्यावर खूप प्रेम आहे. तिला सलमान खान सोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल ती खूप खूश आहे.


असं सांगितलं जातं की बजरंगी भाईजानच्या शूटिंग दरम्यान तीव्र (High Pitched ) आवाजाने हर्षाली घाबरून जायची. त्यावेळी कबीर खान व सलमान खान हर्षालीला कोणत्यातरी गोष्टींमध्ये बिझी ठेवायचे.
जेव्हा हर्षालीला कोणता सीन समजला नाही तर ती सरळ कबीर खान यांच्याकडे जायची आणि त्यांना सीनबद्दल विचारायची.


Web Title: bajrangi bhaijaan completes 4 years know salman khan munni harshaali malhotra film related things
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.