Badshah gets sunburnt; shares pictures from Maldives vacation | मालदीव व्हॅकेशनदरम्यान बादशाहच्या चेहऱ्याची झाली अशी अवस्था, ओळखणंही झालंय कठीण

मालदीव व्हॅकेशनदरम्यान बादशाहच्या चेहऱ्याची झाली अशी अवस्था, ओळखणंही झालंय कठीण

बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर बादशाहने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो पाहून चाहते काळजीत पडले आहेत. त्यालाही कारणही तसेच आहे. बादशाहने शेअर केलेल्या फोटोत त्याला ओळखणंही कठीण झाले आहे. या फोटोत त्याचा चेहरा भाजल्यासारखा दिसतो आहे. उन्हामुळे त्याची त्वचा खराब झाली आहे.  सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल होत आहे. 

बादशाहच्या या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, त्याचा नाक, गाल, संपूर्ण चेहऱ्यावरती त्वचा सोलली गेली आहे. त्याचप्रमाणे चेहरा लाल देखील झाला आहे. त्याची ही अवस्था मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय केल्यानंतर झाली आहे.

बादशाहच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. गायक अरमान मलिकने 'बॅड बर्न' म्हटले आहे तर अभिनेता मनिष पॉलने म्हटलं की, 'भाई, टोस्टरमध्ये ब्रेडच्या ऐवजी तू स्वत: पडलास का?' बादशाहच्या या पोस्टवर अनेक स्टार्सनी कमेंट केली आहे. वरूण धवन देखील सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मालदीवमध्ये गेला होता. त्याची देखील अशीच अवस्था झाली होती. बादशाहच्या या पोस्टवर वरूणने देखील कमेंट केली आहे. 'माझ्यासोबतही असंच झालं होते', अशी कमेंट वरूणने केली आहे.

बादशाहच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या त्याचे 'टॉक्सिक' हे गाणे नुकतंच रिलीज झाले आहे. हे गाणेयामध्ये रवि दुबे आणि सरगुन मेहना हे सेलिब्रिटी कपल आहे. युट्यूबवर देखील ट्रेंडिगमध्ये हे गाणं दिसत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Badshah gets sunburnt; shares pictures from Maldives vacation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.