Bachchan Pandey : Arshad Warsi demanded this huge amount for Akshay Kumars film | 'बच्चन पांडे'साठी अरशद वारसीने मागितली 'इतकी' रक्कम, निर्मात्यांना बसला होता धक्का!

'बच्चन पांडे'साठी अरशद वारसीने मागितली 'इतकी' रक्कम, निर्मात्यांना बसला होता धक्का!

अक्षय कुमारचा आगामी 'बच्चन पांडे' सिनेमा सध्या वेगवेगळ्या कारणानी चर्चेत आहे. नुकतीच अक्षय कुमार आणि आणि क्रिती सेननच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात अरशद वारसीची धमाकेदार एन्ट्री झाली आहे. पण या सिनेमात अशरद वारसीचं जुळणं इतकं सोपं नव्हतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरशदने या सिनेमासाठी इतकी मोठी रक्कम मागितली होती की निर्मात्यांना धक्का बसला होता.

बॉलिवूड हंगामा या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, या सिनेमासाठी अरशद वारसीने निर्मात्यांना तब्बल ४ कोटी रूपयांची मागणी केली होती. इतकी मोठी रक्कम ऐकल्यावर निर्माते हैराण झाले होते. असं असलं तरी निर्माते अरशदसोबत बोलत राहिले आणि त्यापेक्षा कमी किंमतीत या सिनेमासाठी त्याला साइन केलं. असे म्हणतात की, अरशदला या सिनेमासाठी २.५० कोटी रूपये मानधन ठरवण्यात आलं आहे. 

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, 'साजिद आणि त्याच्यासोबत असलेला दिग्दर्शक फरहादला अरशद हवाच होता. अनेक नावांवर विचार केल्यावर अरशदला घेण्याचं फायनल झालं होतं. याबाबत कोरोना येण्याआधीपासून चर्चा सुरू होती. तेव्हा त्याने ४ कोटी रूपयांची मागणी केली होती. त्यानंतर गेल्या काही महिन्यात पुन्हा पैशांबाबत चर्चा झाली. अखेर डील २.५० कोटी रूपयांवर फायनल झाली'.

दरम्यान, बच्चन पांडेचं शूटींग जानेवारी महिन्यात सुरू होणार आहे. शूटींग २ महिने चालेल आणि सिनेमा मार्चपर्यंत पूर्ण करण्याचं प्लॅनिंग आहे. या सिनेमात पहिल्यांदाच अक्षय कुमार आणि अरशद वारसी एकत्र धमाका करताना दिसणार आहेत. सिनेमात अरशद वासरी अक्षय कुमारच्या मित्राच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा सुपरहिट तमिळ सिनेमा जिगरठंडाचा हिंदी रिमेक आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bachchan Pandey : Arshad Warsi demanded this huge amount for Akshay Kumars film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.