टॉलिवूड, बॉलिवूडनंतर ‘बाहुबली’ फेम राणा दग्गुबतीला हॉलिवूडची ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 03:31 PM2019-02-03T15:31:11+5:302019-02-03T15:33:11+5:30

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ या चित्रपटात खलनायक साकारणारा राणा दग्गुबती याला विसरणे शक्यचं नाही. बाहुबली साकारणा-या प्रभासच्या तोडीस तोड अभिनय करून राणानेही चाहत्यांची मने जिंकली. आता राणाच्या अभिनयाने हॉलिवूडलाही भूरळ पाडली आहे.

baahubali star rana daggubati goes to hollywood | टॉलिवूड, बॉलिवूडनंतर ‘बाहुबली’ फेम राणा दग्गुबतीला हॉलिवूडची ऑफर!

टॉलिवूड, बॉलिवूडनंतर ‘बाहुबली’ फेम राणा दग्गुबतीला हॉलिवूडची ऑफर!

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या राणा   ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून त्याची बहुतांश शूटिंग मुंबईत होणार आहे.

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ या चित्रपटात खलनायक साकारणारा राणा दग्गुबती याला विसरणे शक्यचं नाही. बाहुबली साकारणा-या प्रभासच्या तोडीस तोड अभिनय करून राणानेही चाहत्यांची मने जिंकली. आता राणाच्या अभिनयाने हॉलिवूडलाही भूरळ पाडली आहे.  होय, आधी राणाने साऊथमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण केला. यानंतर बॉलिवूडमध्येही त्याने जोरदार एन्ट्री घेतली. आता राणाला हॉलिवूडच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत.
ताज्या वृत्तानुसार, राणाला एका मोठ्या हॉलिवूडपटाची ऑफरआली आहे आणि सध्या याची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात राणाला एक दमदार रोल ऑफर करण्यात आला आहे. राणाने ही ऑफर स्वीकारली की नाही, हे अद्याप समजू शकलेले नाही. त्यामुळे राणा ही ऑफर स्वीकारतो की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सध्या राणा   ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून त्याची बहुतांश शूटिंग मुंबईत होणार आहे. त्याशिवाय तो आगामी ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटातही झळकणार आहे.


राणा केवळ एक अभिनेता नाही तर व्हिज्युअल इफेक्ट्स डायरेक्टर आणि फोटोग्राफर अशीही त्याची ओळख आहे. कोणिक इन्स्टिट्यूट आॅफ इमेजिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीमधून त्याने फोटोग्राफीचा कोर्स केला आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर राणाने चेन्नईत अनेक डॉक्युमेंट्री व अ‍ॅड फिल्म्सचे दिग्दर्शन केले. यानंतर हैदराबादेत येऊन तो आपल्या वडिलांचे प्रॉडक्शन हाऊस सांभाळू लागला.२०१० मध्ये राणाने त्याचे फिल्मी करिअर सुरू केले. यावर्षी आलेल्या ‘लीडर’ या पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटातून त्याने डेब्यू केला. यानंतर अनेक तामिळ चित्रपटात तो झळकला. पण राणाला खरी ओळख दिली ती ‘बाहुबली’ने. या चित्रपटातील त्याची भूमिका नकारात्मक होती. पण तरिही प्रभासच्या अर्थात बाहुबलीच्या भूमिकेच्या तोडीस तोड होती.

Web Title: baahubali star rana daggubati goes to hollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.