baahubali-and-saahoactor-prabhas-have-expensive-car-than-shahrukh-khan-amitabh-bachchan | आवड ह्या अभिनेत्याला महागड्या गोष्टींची, अमिताभ बच्चन व शाहरूखलाही टाकले मागे
आवड ह्या अभिनेत्याला महागड्या गोष्टींची, अमिताभ बच्चन व शाहरूखलाही टाकले मागे

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास 'बाहुबली : द बिगनिंग' आणि 'बाहुबली : द कन्क्लुजन' या चित्रपटातून फक्त देशभरातच नाही तर जगभरात लोकप्रिय झाला. आता त्याचे चाहते फक्त देशातच नाही सातासमुद्रा पार आहेत. या दोन्ही चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा इतिहास रचला. त्याचे चाहते त्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. फार कमी लोकांना माहित आहे की प्रभासला महागड्या गोष्टींची आवड आहे. त्याला महागड्या गाडीतून फिरायला आवडते व राजेशाही जीवन जगायला खूप आवडते.

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, प्रभासकडे महागड्या गोष्टींचे कलेक्शन आहे. जवळपास १९६.३५ कोटींची संपत्ती असून प्रभासकडे ६८ लाखांची एसयूव्ही गाडी आहे. याशिवाय दीड कोटींचे जिमही आहे. त्याला ही जिम बाहुबलीच्या निर्मात्यांनी भेट म्हणून दिले होते. याशिवाय त्याच्याकडे २.०८ कोटींची सेडान कार आहे. हैदराबादमध्ये त्याचे ६० कोटी रुपयांचे फार्म हाऊसही आहे. तर प्रभासकडे ८ कोटींची कार आहे जी अमिताभ बच्चन व शाहरूख खान यांच्या कारपेक्षाही महागडी आहे. 


प्रभासच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सांगायचे तर लवकरच तो साहो चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. श्रद्धा या चित्रपटातून दाक्षिणात्य इंडस्ट्रीत पदार्पण करते आहे. 'साहो'मध्ये प्रभास व श्रद्धा कपूरसोबत, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या विविध भाषांमध्ये शूट केला गेला आहे.

प्रभासला 'साहो' सिनेमात अ‍ॅक्शन करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.


Web Title: baahubali-and-saahoactor-prabhas-have-expensive-car-than-shahrukh-khan-amitabh-bachchan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.