‘बाहुबली’ फेम अभिनेत्रीने शेअर केला टॉपलेस फोटो, चाहते खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 02:46 PM2019-12-25T14:46:19+5:302019-12-25T14:48:18+5:30

आपल्या बोल्ड फोटोंमुळे ती सतत चर्चेत असते.

baahubali actress scarlett wilson share topless picture on instagram | ‘बाहुबली’ फेम अभिनेत्रीने शेअर केला टॉपलेस फोटो, चाहते खल्लास

‘बाहुबली’ फेम अभिनेत्रीने शेअर केला टॉपलेस फोटो, चाहते खल्लास

googlenewsNext
ठळक मुद्देअलीकडे इमरान हाश्मीच्या ‘द बॉडी’ या सिनेमातील एका गाण्यात ती झळकली होती.

बाहुबली- द बिगनिंग’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करणारी अभिनेत्री स्कारलेट मेलिश विल्सन रिअल लाईफमध्ये कमालीची बोल्ड आहे. आपल्या बोल्ड फोटोंमुळे ती सतत चर्चेत असते. सध्या स्कारलेटचा असाच एक फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. होय, स्कारलेटने एक टॉपलेस फोटो शेअर करून सोशल मीडियावर खळबळ निर्माण केली आहे.

सध्या तिचा हा फोटो तुफान व्हायरल होतोय. साहजिकच चाहते तिची प्रशंसा करताना थकत नाहीयेत. यात ती आरशासमोर टॉपलेस पोज देताना दिसतेय.


स्कारलेटने याआधी अनेकदा स्विमसूट व बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत.
स्कारलेट एक ब्रिटीश मॉडेल आहे. ‘बाहुबली’तील ‘मनोहरी’ या गाण्यात ती बेली डान्स करताना दिसली होती. अनेक तेलगू सिनेमातही तिने आयटम नंबर्स केले आहेत.  

‘येवडू’, ‘चंडी’, ‘प्रेम अड्डा’ अशा साऊथच्या अनेक सिनेमात तिने काम केलेय. अलीकडे इमरान हाश्मीच्या ‘द बॉडी’ या सिनेमातील एका गाण्यात ती झळकली होती. त्याआधी शंघाई व आर. राजकुमार या चित्रपटातील तिने आयटम सॉन्ग करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. डान्सर म्हणून तिची एक वेगळी ओळख आहे. तिच्या डान्सवर चाहते फिदा आहेत. झलक दिखला जा आणि डेअर टू डान्स या रिअ‍ॅलिटी शोमध्येही ती झळकली होती.


काही वर्षांपूर्वी सेटवर गैरवर्तन करणाºया आपल्या को-स्टारच्या स्कारलेटने थोबाडीत हाणली होती. 2008 मध्ये मिस्टर इंडिया राहिलेल्या प्रवेश राणासोबत तिने साखरपुडा केला होता. सुमारे 7 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न केले होते.  

Web Title: baahubali actress scarlett wilson share topless picture on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.