ठळक मुद्दे‘बाहुबली 2’ या अभूतपूर्व यशस्वी ठरलेल्या चित्रपटात अनुष्काने देवसेनाची भूमिका साकारली होती.

‘बाहुबली’ फेम देवसेना अर्थात अनुष्का शेट्टी ही एका अपघातातून थोडक्यात बचावली. अनुष्का लवकरच सुरपस्टार चिरंजीवीसोबत ‘सैरा नरसिम्हा रेड्डी’ या सिनेमात झळकणार आहेत. सध्या या सिनेमाचे शूटींग सुरु आहे. याच शूटींगदरम्यान अनुष्काचा अपघात झाला आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का चित्रपटाचा एक सीन शूट करत होती. याचदरम्यान तिला अपघात झाला आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाला. या अपघाताचा गवगवा होऊ नये म्हणून ती गुपचूप डॉक्टरांकडे गेली. तूर्तास डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.


‘सैरा नरसिम्हा रेड्डी’ हा साऊथचा यंदाचा सर्वाधिक चर्चित चित्रपट आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीजर  प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनुष्का कॅमिओ रोलमध्ये असल्याचे कळतेय. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हेही यात पाहुण्या कलाकाराच्या दिसणार आहेत. येत्या २ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. हा एक पीरियड ड्रामा आहे.

हा चित्रपट स्वातंत्र्य सेनानी यू नरसिम्हा रेड्डी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. काही दिवसांपूर्वी बिग बींनी या चित्रपटाबद्दल आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले होते. मी इतिहासातील सर्वाधिक शूर व्यक्तिरेखा साकारणार आहे, असे त्यांनी लिहिले होते.  ‘सैरा नरसिम्हा रेड्डी’ हा चित्रपट तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम अशा चार भाषांत प्रदर्शित होणार आहे. 


‘बाहुबली 2’ या अभूतपूर्व यशस्वी ठरलेल्या चित्रपटात अनुष्काने देवसेनाची भूमिका साकारली होती. तिची आणि प्रभासची जोडी कमालीची लोकप्रिय झाली होती. यानंतर दोघांच्या अफेअरच्या बातम्याही चर्चेत होत्या.‘बाहुबली 2’नंतर ‘भागमथी’ या चित्रपटात अनुष्का अखेरची झळकली होती.  ‘सैरा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटानंतर अनुष्का ‘सायलेंसम’ या चित्रपटात बिझी होणार आहे.


Web Title: baahubali actress anushka shetty fractures her leg while shooting sye raa narasimha reddy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.