बाहुबली चित्रपटातून देवसेनेच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिला सिनेइंडस्ट्रीत १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. तिच्यासाठी हा दिवस खूप खास आहे. तिने या निमित्ताने तिच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर शेअर करून तिच्या चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. या चित्रपटाचं नाव आहे निशब्दम.

 

यानिमित्ताने अनुष्काने सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. तिने म्हटलं की, १४ वर्षांत प्रत्येक पावलांवर सर्वांकडून खूप सारे प्रेम मिळाले. मी सगळ्यांचे आभार मानते. दिग्दर्शक, निर्माते, सहकलाकार, क्रु आणि माझा स्टाफ या प्रवासात माझ्यासोबत असणारा प्रत्येक व्यक्तींचे मी आभार मानते. हा प्रवास अविस्मरणीय बनवण्यासाठी त्यांची मी आभारी आहे. 


 बाहुबली या चित्रपटातून अनुष्काने दाक्षिणात्यच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाली. अनुष्काने तिचं शिक्षण बंगळुरूमधून केली आहे. अनुष्काचं खरं नाव स्वीटी शेट्टी आहे. चित्रपटसृष्टीत करियरला सुरूवात करण्यापूर्वी अनुष्का योगा इंस्ट्रक्टर होती. 


अनुष्काचं सौंदर्य पाहून तिला एका दिग्दर्शकाने चित्रपटाची ऑफर दिली होती. अनुष्काने २००५ साली तेलुगू चित्रपट सुपरमधून पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व आयशा टाकिया मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात तिची सपोर्टिंग भूमिका होती. यातील तिच्या कामाचं खूप कौतूक झालं होतं. 


बाहुबली चित्रपटाव्यतिरिक्त अनुष्कानं मगधीरा, रुद्रमादेवी, वेदम, अरुंधति आणि सिंघम सीरिज यासारख्या चित्रपटात काम केलं. बाहुबली फेम अभिनेता प्रभाससोबत अनुष्का शेट्टीचं नाव जोडलं जातं. मात्र ते दोघे एकमेकांचे फ्रेंड्स असल्याचं सांगतात. 

Web Title: Baahubali Actress Anushka Shetty Completes 14 Years In Film Industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.