ayushmann khurrana rejected neena gupta for badhaai ho the kapil sharma show | ‘बधाई हो’साठी तब्बूने सुचवले होते नीना गुप्तांचे नाव; पण आयुष्यमान खुराणाने दिला होता नकार!
‘बधाई हो’साठी तब्बूने सुचवले होते नीना गुप्तांचे नाव; पण आयुष्यमान खुराणाने दिला होता नकार!

ठळक मुद्देअसा चित्रपट एकदाच बनतो, हे मला ठाऊक होते. त्यामुळे मी माझ्या होकारावर ठाम राहिले, असेही नीनांनी यावेळी सांगितले.

‘बधाई हो’ या चित्रपटाने अनपेक्षित कमाई केली आणि आयुष्यमान खुराणाला थेट बॉलिवूडच्या ए लिस्ट स्टार्सच्या यादीत नेऊन बसवले. गतवर्षी   प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासाठी नीना गुप्ता आणि गजराज राव यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले. शनिवारी रात्री ‘बधाई हो’चे कलाकार नीना गुप्ता आणि गजराज राव यांनी कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. यावेळी नीना गुप्ता यांनी एक शॉकिंग खुलासा केला.


होय, या चित्रपटाची आॅफर आली, तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? असा प्रश्न कपिलने नीना यांना केला. यावर, मी चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली आणि लगेच होकार दिला. पण आयुष्यमान खुराणाने मात्र सुरुवातीला माझ्या नावाला नकार दिला होता,असे नीना यांनी सांगितले. नीना यांना आयुष्यमानने नकार द्यावा, हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. पुढे नीना यांनी या नकारामागचे सविस्तर कारणही सांगितले. ‘आधी या चित्रपटासाठी तब्बू ही मेकर्सची पहिली चॉईस होती. मेकर्स ‘बधाई हो’ची आॅफर घेऊन तब्बूकडे गेलेत. पण तब्बूने नकार दिला. मी या भूमिकेत फिट बसत नाही, असे सांगून तिने या भूमिकेसाठी माझे (नीना गुप्ता)नाव सुचवले. मेकर्सनी लगेच आयुष्यमानला ही गोष्ट सांगितली. पण आयुष्यमान मानेना. नीना गुप्ता माझ्या आईची भूमिका कशी करू शकतात. त्या तर खूपच हॉट दिसतात, असे सांगून आयुष्यमानने माझ्या नावाला नकार दिला. आयुष्यमानच्या नकारानंतर सगळेच चिंतेत पडले. मग कुणीतरी त्याला माझी ‘खुजली’ ही शॉर्ट फिल्म पाहण्याचा सल्ला दिला. त्याने ती पाहिली आणि ती पाहिल्यानंतर ‘बधाई हो’साठी माझे नाव फायनल झाले,’ असे नीना यांनी यावेळी सांगितले.


चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकताच मी होकार दिला होता. पण नंतर संपूर्ण चित्रपटात प्रेग्नंट राहावे लागेल. उन्हाळ्याचे दिवस असतील, असा एक विचारही माझ्या मनात आला होता. अर्थात हा एक ड्रिम रोल आहे आणि असा चित्रपट एकदाच बनतो, हे मला ठाऊक होते. त्यामुळे मी माझ्या होकारावर ठाम राहिले, असेही नीनांनी यावेळी सांगितले.


Web Title: ayushmann khurrana rejected neena gupta for badhaai ho the kapil sharma show
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.