Ayushmann Khurrana Birthday Special : आयुषमान खुराणाने पत्नीला आजवर दिलीय अशी साथ, पाहा त्याच्या गोंडस मुलांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 12:09 PM2019-09-14T12:09:19+5:302019-09-14T12:14:11+5:30

आयुषमान खुराणाचे लग्न ताहिरा कश्यपसोबत झाले असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

ayushmann khurrana family picture : Here is a photo of his cute children with Ayushman Khurana | Ayushmann Khurrana Birthday Special : आयुषमान खुराणाने पत्नीला आजवर दिलीय अशी साथ, पाहा त्याच्या गोंडस मुलांचे फोटो

Ayushmann Khurrana Birthday Special : आयुषमान खुराणाने पत्नीला आजवर दिलीय अशी साथ, पाहा त्याच्या गोंडस मुलांचे फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देआयुषमान त्याच्या कामात कितीही व्यग्र असला तरी तो त्याच्या कुटुंबियांना वेळ देतो.

आयुषमान खुराणाचा आज वाढदिवस असून त्याचा जन्म चंडिगडमधील आहे. त्याचे खरे नाव आयुषमान नव्हे तर निशांत खुराणा आहे. पण तो तीन वर्षांचा असताना त्याच्या पालकांनीच त्याचे नाव बदलले. त्याचे शिक्षण पंजाबमध्येच झाले. त्यानंतर त्याने रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. तो 17 वर्षांचा असताना चॅनल व्हीवरील एका कार्यक्रमात तो झळकला होता. 

त्याने आरजे म्हणून देखील काम केले आहे. छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर त्याला विकी डोनर या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या पहिल्याच चित्रपटाने त्याला स्टार बनवले. त्याने आजवर शुभ मंगल सावधान, बधाई हो, बरेली की बर्फी, आर्टिकल 15 यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

आयुषमान खुराणाचे लग्न ताहिरा कश्यपसोबत झाले असून ताहिरा ही त्याची बालमैत्रीण आहे. अनेक वर्षांच्या अफेअरनंतर त्या दोघांनी 2008 मध्ये लग्न केले. 

त्यांना वीराजवीर आणि वरुष्का अशी दोन मुलं आहेत. 

वीराजवीरचा जन्म 2012 मधील तर वरुष्काचा जन्म 2014 मधील आहे. 

आयुषमान त्याच्या कामात कितीही व्यग्र असला तरी तो त्याच्या कुटुंबियांना वेळ देतो. त्याची पत्नीने काही वर्षांपूर्वी टॉफी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

ताहिराला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे काही महिन्यांपूर्वी निदान झाले. या आजाराचा तिने धैर्याने सामना केला आणि ही लढाई जिंकलीही. ताहिराने आपल्या आजाराबद्दल काहीही लपवले नाही. केमोथेरपीने डोक्यावरचे केस गळले. पण ते लपवण्यासाठी ताहिराने खोटे केस लावले नाहीत तर थेट मुंडण केले, अगदी मुंडण केलेल्या अवतारात ती लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवरही उतरली. यानंतर ताहिराने काय करावे तर, आपल्या सर्जरीची जखम दाखवणारा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. तिच्या या पोस्टचे बरेच कौतुक झाले. आता ताहिरा बॉयकट हेअरस्टाईलमध्ये दिसू लागली आहे. पण काही लोकांनी यावरूनही तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत. आयुषमान नेहमीच त्याच्या पत्नीच्या या कठिण काळात तिच्या पाठिशी उभा राहिला. 

Web Title: ayushmann khurrana family picture : Here is a photo of his cute children with Ayushman Khurana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.