अवॉर्ड फंक्शनमध्ये रितेशला प्रिती झिंटाच्या हातावर किस करणं पडलं महागात, मग जेनेलियानं केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 02:31 PM2021-03-19T14:31:19+5:302021-03-19T14:31:54+5:30

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा- देशमुखचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

At the award function, Riteish had to kiss Preity Zinta's hand expensively, then something like Genelia did ... | अवॉर्ड फंक्शनमध्ये रितेशला प्रिती झिंटाच्या हातावर किस करणं पडलं महागात, मग जेनेलियानं केलं असं काही...

अवॉर्ड फंक्शनमध्ये रितेशला प्रिती झिंटाच्या हातावर किस करणं पडलं महागात, मग जेनेलियानं केलं असं काही...

googlenewsNext


रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा इंडस्ट्रीमधील सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. मात्र नुकताच त्यांचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. जो त्यांच्या चाहत्यांना खूप भावतो आहे.

नुकतेच जेनेलिया डिसुझाने एक मजेशीर व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का घरी गेल्यावर काय होते?

या व्हिडीओत पहायला मिळतंय की, एका अवॉर्ड फंक्शनमध्ये रितेश देशमुख अभिनेत्री प्रिती झिंटाला भेटल्यावर तिच्या बोलून झाल्यावर तिच्या हाताची किस घेताना दिसतो आहे आणि हे सगळे एका बाजूला उभी राहून जेनेलिया पाहताना दिसते आहे. खरेतर हा जुना व्हिडीओ आहे, हा व्हिडीओ यापूर्वी व्हायरल झाला होता. मात्र आता या व्हिडीओनंतर काय घडले, हे जेनेलियाने या व्हिडीओत दाखवले आहे. जेनेलियाने घरी आल्यावर रितेशला क्या किया क्या किया म्हणत मारण्याची एक्शन केली. 
जेनेलिया देशमुखच्या या व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे. या व्हिडीओवर चाहतेच नाही तर सेलिब्रेटीही कमेंट्स करत आहेत. 


रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा नेहमी मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात आणि बऱ्याचदा त्यांचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.


रितेश आणि जेनेलियाने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघे दोन वेळा विवाहबंघनात अडकले. त्यांचे कारण म्हणजे, जेनेलिया ख्रिश्चन आहे आणि रितेश हिंदू. त्यामुळे दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने विवाह थाटला.

Web Title: At the award function, Riteish had to kiss Preity Zinta's hand expensively, then something like Genelia did ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.