Avantika send sorry note to imran khan | बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्याचा संसार मोडता-मोडता राहिला
बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्याचा संसार मोडता-मोडता राहिला

ठळक मुद्देकोणत्या गोष्टीसाठी मागितली ते कारण अद्याप गुलदस्त्यात आहे

गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पसर्नल लाईफला घेऊन तो चर्चेत आहे. बी-टाऊनमध्ये त्याच्या घटस्फोटाची जोरदार होती.  आम्ही बोलतोय ते, इमरान खान आणि अवंतिकाबद. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. अवंतिका त्याचे घरं सोडून माहेरी राहिलादेखील गेली होती.  मात्र अवंतिकाने इमरान खानच्या बर्थ डेच्या दिवशी फुलांचा गुच्छ पाठवून या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. फुलांच्या गुच्छासोबत अवंतिकाने एक सॉरीची माफिची नोट देखील पाठवली आहे.  या सगळ्यांवरुन एक गोष्ट स्पष्ट होते की अवंतिकाने नवी सुरुवात करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. 


अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, अवंतिकाने एक भावूक संदेश पाठवून इमरान खानची माफी मागितली आहे.  नेमकी अंवतिकाने माफी कोणत्या गोष्टीसाठी मागितली ते कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. अवंतिकाने इमरान खानपासून दूर जाऊन वेलनेस सेंटर ज्वॉईन केले होते. हा तीन आठवड्यांचा कोर्स होता. रिपोर्टनुसार अवंतिकाने इमरानचे घरं सोडल्यापासून दोघांनी एकदा ही एकमेकांशी संवाद साधला नाही.  


काही दिवसांपूर्वी अवंतिकाच्या आईने खुलासा केला होता की, इमरान व अवंतिका यांच्यात काही मतभेद आहेत. पण ते लवकरच मिटतील. पुढे त्या म्हणाल्या होत्या की, इमरान आणि अवंतिका दोघांचेही कुटुंबीय दोघांमधील भांडण मिटवण्याच्या प्रयत्नात आहेत. इमरानने २०११ साली अवंतिकासोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांना इमायरा नावाची एक मुलगीही आहे. २००८ मध्ये इमरानने ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता.२०१५ मध्ये त्याचा ‘कट्टी बट्टी’ प्रदर्शित झाला. तेव्हापासून तो एकाही चित्रपटात दिसला नाही. अलीकडे दिग्दर्शनात हात आजमवण्याचे प्रयत्न इमरानने सुरु केले होते. सध्या तो एका शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन करतोय. या शॉर्टफिल्मचे नाव ‘मिशन मार्स : कीप वॉकिंग इंडिया’ आहे. 


Web Title: Avantika send sorry note to imran khan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.