ठळक मुद्देइमरानने २०११ साली अवंतिकासोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांना इमायरा नावाची एक मुलगीही आहे.

आमिर खानचा भाचा आणि बॉलिवूडचा अभिनेत इमरान खान याचे फिल्मी करिअर बुडाल्यात जमा आहे. गत चार वर्षांत इमरानचा एकही चित्रपट रिलीज झालेला नाही. आता त्याच्या संसारातही कुरबुर सुरु आहे. इमरान व त्याची पत्नी अवंतिका या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. केवळ इतकेच नाही तर  मतभेद इतके विकोपाला गेले आहेत की, इमरानचे घर सोडून अवंतिका आपल्या आईवडिलांच्या घरी शिफ्ट झाली आहे. आता अवंतिकाच्या आईनेही या बातमीवर शिक्कामोर्तब केले आहे.

इन डॉटकॉमने दिलेल्या बातमीनुसार, इमरान व अवंतिकाच्या संसारात फार काही ठीक सुरु नसल्याच्या वृत्ताला अवंतिकाच्या आईने दुजोरा दिला आहे. अर्थात दोघेही विभक्त होण्याच्या विचारात आहेत, या वृत्ताचा अवंतिकाच्या आईने इन्कार केला आहे. इमरान व अवंतिका यांच्यात काही मतभेद आहेत. पण ते लवकरच मिटतील, असे तिच्या आईने म्हटले आहे. तूर्तास इमरान आणि अवंतिका दोघांचेही कुटुंबीय दोघांमधील भांडण मिटवण्याच्या प्रयत्नात आहेत.

इमरानने २०११ साली अवंतिकासोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांना इमायरा नावाची एक मुलगीही आहे. २००८ मध्ये इमरानने ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता. हा चित्रपट हिट राहिला आणि इमरानचे करिअर मार्गी लागले. पाठोपाठ अनेक चित्रपटांत तो दिसला. पण यापैकी एकही चित्रपट हिट झाला नाही. २०१५ मध्ये त्याचा ‘कट्टी बट्टी’ प्रदर्शित झाला. तेव्हापासून तो एकाही चित्रपटात दिसला नाही. अलीकडे दिग्दर्शनात हात आजमवण्याचे प्रयत्न इमरानने सुरु केले होते. सध्या तो एका शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन करतोय. या शॉर्टफिल्मचे नाव ‘मिशन मार्स : कीप वॉकिंग इंडिया’ आहे. 


Web Title: avantika malik mother reaction aamir khan nephew on imran khan and her daughter separation rumours
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.