केएल राहुल व अथिया एकमेकांच्या प्रेमात; हा घ्या पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 12:10 PM2020-01-03T12:10:52+5:302020-01-03T12:50:20+5:30

दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके...

athiya shetty and k l rahul return mumbai after new year celebration | केएल राहुल व अथिया एकमेकांच्या प्रेमात; हा घ्या पुरावा

केएल राहुल व अथिया एकमेकांच्या प्रेमात; हा घ्या पुरावा

googlenewsNext
ठळक मुद्देअगदी काही दिवसांपूर्वी सुनील शेट्टी अथियाच्या रिलेशनशिपबद्दल बोलला होता.

क्रिकेटर आणि बॉलिवूड नट्या यांच्या रिलेशनशिपची चर्चा नवी नाही. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्नगाठ बांधली. युवराज सिंगने हेजल किचसोबत, झहीर खानने अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत विवाह केला. नववर्षात क्रिकेटर हार्दिक पांड्यानेही अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिचसोबत साखरपुडा करून सर्वांना सुखद धक्का दिला. आता क्रिकेट- बॉलिवूडचे आणखी एक कपल चर्चेत आहे.

होय, सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी व क्रिकेटपटू के. एल. राहुल यांच्या अफेअरच्या चर्चा सध्या जोरात आहेत. अद्याप अथिया व राहुलने आपल्या नात्याची अधिकृतरित्या कबुली दिलेली नाही. पण म्हणून हे नाते कुणापासूनही लपलेले नाही. 
काही दिवसांपूर्वी राहुलने अथियासोबतचा फोटो पोस्ट केला होता.  या फोटोनंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. पण आता हे नाते कन्फर्म झाले आहे. विश्वास बसत नसेल तर या कपलचे नवे फोटो तुम्ही पाहायलाच हवेत.

होय, अथिया व राहुल दोघेही ख्रिसमस आणि न्यू ईअर साजरे करण्यासाठी थायलंडला गेले होते. गत रात्री दोघेही मुंबईला परतले. मुंबई विमानतळावर दोघांनाही एकत्र स्पॉट केले गेले.

यावेळी त्यांच्यासोबत आकांक्षा रंजन, अनुष्का रंजन, अभिनेता आदित्य सील आणि उस्मान सिद्दीकी असे मित्रही दिसले. मुंबई विमानतळावर अथिया व राहुल दोघेही मॅचिंग ब्ल्यू कलरच्या कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसले. दोघांचे फोटो ते  एकमेकांच्या प्रेमात असल्याचा पक्का पुरावा मानला जात आहेत.

अगदी काही दिवसांपूर्वी सुनील शेट्टी अथियाच्या रिलेशनशिपबद्दल बोलला होता. काळ बदलतो आहे. मला अथिया व अहान दोघांचीही आवड माहित आहे. मला अहानची गर्लफ्रेन्ड आवडते. अथिया ज्याच्यासोबत आहे, तोही मला आवडतो. मला काहीही अडचण नाही. माझी पत्नी मानाही आनंदी आहे, असे सुनील शेट्टी म्हणाला होता.
 

Web Title: athiya shetty and k l rahul return mumbai after new year celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.