aryan khan with dad shahrukh khan in hindi version of lion king will voice simba |  कन्फर्म! बॉलिवूड नाही तर हॉलिवूडमधून होणार आर्यन खानचा धमाकेदार डेब्यू!!
 कन्फर्म! बॉलिवूड नाही तर हॉलिवूडमधून होणार आर्यन खानचा धमाकेदार डेब्यू!!

ठळक मुद्देडिज्नी कंपनी ‘द लायन किंग’ या सुपरहिट चित्रपटाची नवी आवृत्ती घेऊन येतोय. यात अ‍ॅनिमेशनच्या नव्या तंत्राचा वापर करण्यात आला आहे.

किंग खान शाहरुख खान याचा मोठा मुलगा आर्यन खान बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. पण याचदरम्यान शाहरुखने एक वेगळाच खुलासा करत, सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. होय,आर्यनला अभिनयात अजिबात रस नाही. तो अभिनयाऐवजी दिग्दर्शन करेल, असे शाहरूखने स्पष्ट केले होते. पण  याचदरम्यान आर्यन खान ‘द लायन किंग’ नावाच्या चित्रपटातून डेब्यू करतोय, अशी बातमी आली आणि ही बातमी वा-याच्या वेगाने पसरली. आता ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी  ही बातमी कन्फर्म केली आहे. सोशल मीडियावर एक ट्विट करत त्यांनी ही ‘बिग न्यूज’ शेअर केली आहे.
त्यानुसार, शाहरुख व आर्यन या बापलेकांनी डिज्नीच्या ‘द लायन किंग’ या हिंदी अ‍ॅनिमेटेड चित्रपटासाठी आपला आवाज दिला आहे. शाहरूख   मुफासा नामक सिंहाच्या अ‍ॅनिमेटेड पात्राला आपला आवाज देणार आहे तर आर्यन खान या सिंहाचा छावा अर्थात सिम्बा या अ‍ॅनिमेटेड पात्राला स्वत:चा आवाज देणार आहे. १९ जुलै २०१९ रोजी हा चित्रपट रिलीज होतोय. हा एक अ‍ॅनिमेटेड चित्रपट आहे.
 काल भारत विरूद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर शाहरूख व आर्यन यांनी एक फोटो शेअर केला होता. यात दोघेही निळ्या रंगाची जर्सी घालून पाठमोरे बसलेले दिसले होते. शाहरूखच्या जर्सीवर मुफासा असे लिहिले होते तर आर्यनच्या जर्सीवर सिम्बा असेल लिहिलेले होते. हा फोटो याच चित्रपटाचे संकेत देणारा होता.
तीन वर्षांपूर्वी डिज्नीने ‘जंगलबुक’ हा चित्रपट एका नव्या अवतारात प्रदर्शित केला होता. आता डिज्नी कंपनी ‘द लायन किंग’ या आणखी एका सुपरहिट चित्रपटाची नवी आवृत्ती घेऊन येतोय. यात अ‍ॅनिमेशनच्या नव्या तंत्राचा वापर करण्यात आला आहे. या चित्रपटात मुफासा आणि त्याचा मुलगा सिम्बाची कहाणी आहे.


Web Title: aryan khan with dad shahrukh khan in hindi version of lion king will voice simba
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.