भाऊ अरमान जैनच्या मेहंदी व संगीत सेरेमनीत थिरकली करिश्मा कपूर, पाहा Inside Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 12:59 PM2020-02-03T12:59:27+5:302020-02-03T13:00:46+5:30

अरमान की शादी...

armaan jain mehendi sangeet ceremony inside pics | भाऊ अरमान जैनच्या मेहंदी व संगीत सेरेमनीत थिरकली करिश्मा कपूर, पाहा Inside Photos

भाऊ अरमान जैनच्या मेहंदी व संगीत सेरेमनीत थिरकली करिश्मा कपूर, पाहा Inside Photos

googlenewsNext
ठळक मुद्देअरमान हा रिमा जैन व मनोज जैन यांचा मुलगा आहे

बॉलिवूडमध्ये वेडिंग सीझन पुन्हा सुरु झाले आहे. लवकर बॉलिवूडच्या कपूर कुटुंबाच्या घरात सनईचौघडे वाजणार आहेत.   होय, राज कपूर यांची कन्या रिमा जैन हिचा मुलगा अरमान जैन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गर्लफ्रेन्ड अनीसा मल्होत्रा हिच्यासोबत अरमान लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन सुरु झाले आहे. रविवारी अरमान व अनीसाच्या मेहंदी व संगीत सेरेमनीचा सोहळा पार पडला.


या सेरेमनीत  सेरेमनीला कपूर कुटुंबातील सर्वांनी हजेरी लावली. करिश्मा कपूर, करिना कपूर, श्वेता बच्चन, सुनील शेट्टी, कियारा अडवाणी, टीना अंबानी असे अनेक सेलिब्रिटी यावेळी हजर होते. या सेरेमनीचे फोटो व इनसाईड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

एकीकडे अरमान व अनीसाच्या हातांवर मेहंदी रचली. दुसरीकडे कपूर कुटुंब आनंदाने थिरकताना दिसले. करिश्मा कपूरने अरमान व अनीसासोबत ठेका धरला.
यावेळी अनीसाने पिवळ्या रंगाचा लहंगा व फुलांचे दागिन्यांनी सजलेली दिसली.


या मेहंदी सेरेमनीत ऋषी कपूर, नीतू सिंग, रणबीर कपूर हजर नव्हते. ऋषी कपूर यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. नीतू व रणबीरही त्यांच्याजवळ असल्याने कालच्या सोहळ्यात ते नव्हते.


अरमान व अनीसा दोघेही बालपणापासूनचे मित्र आहेत. 2014 मध्ये हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. त्यावेळी अरमानने याचा इन्कार केला होता. अनीसा केवळ माझी बालपणीची मैत्रिण आहे, असे त्याने सांगितले होते.


अनीसा अनेकदा अरमानसोबत दिसायची. पण दोघांनीही आपले नाते जगापासून लपवून ठेवले आणि योग्य वेळ येताच दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. अरमान हा रिमा जैन व मनोज जैन यांचा मुलगा आहे. रिमा ही ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूरची बहीण आहे.


अरमानने सुरुवातीला बॉलिवूडमध्ये जम बसवण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम त्याने करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ आणि ‘एक मैं और एक तू’ या चित्रपटात अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. यानंतर हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. 2014 साली अरमानने ‘हम दीवाना दिल’ या चित्रपटामधून बॉलिवूड डेब्यू केला होता. पण हा चित्रपट सुपरडुपर फ्लॉप ठरला. यानंतर अरमान कुठल्याच चित्रपटात दिसला नाही. पण करिश्मा, करीना, रणबीर यांच्यासोबत तो अनेक पार्ट्यांना दिसतो.

Web Title: armaan jain mehendi sangeet ceremony inside pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.