फोटोत अनिल कपूरसोबत असलेल्या बॉलिवूडच्या या अभिनेत्याला ओळखणं झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 06:39 PM2019-12-17T18:39:50+5:302019-12-17T18:41:35+5:30

बॉलिवूडच्या या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी ५० किलो वजन घटविले होते.

Arjun Kapoor shared old pic on instagram | फोटोत अनिल कपूरसोबत असलेल्या बॉलिवूडच्या या अभिनेत्याला ओळखणं झालंय कठीण

फोटोत अनिल कपूरसोबत असलेल्या बॉलिवूडच्या या अभिनेत्याला ओळखणं झालंय कठीण

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसारखी फिट शरिरयष्टी मिळवण्याची सगळ्या तरूणाईची इच्छा आहे. त्याच्या शरीरयष्टीत केलेल्या बदलामुळे त्याचे चाहते खूपच इंप्रेस झाले आहेत. हल्ली अर्जुन सोशल मीडियावर त्याचे फिट बॉडीचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात. जर अर्जुनचा जुना फोटो पाहिला तर त्याला ओळखणंही कठीण जात आहे. नुकताच त्याने त्याचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.


अर्जुन कपूरने इंस्टाग्रामवर एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याचे काका अनिल कपूर व चुलत भाऊ मोहित मारवाह व अक्षय मारवाह दिसत आहेत. हा फोटो दिल्लीतील एका कुटुंबातील लग्न सोहळ्यातील आहे. हा फोटो शेअर करत अर्जुन कपूरने लिहिले की, मजनू भाई व त्यांचे तीन मस्कीटर्स


नुकतेच अर्जुन कपूरने त्यांच्या जाडेपणा व वजन घटविण्याबाबत सांगितलं होतं. यासोबतच त्याने त्याच्या स्ट्रगलिंग काळाबद्दल सांगितलं. तो म्हणाला की, वजन घटविणे माझ्यासाठी सोप्पे नव्हते मात्र मी खूप मेहनत केली. तसेच त्याने त्याचा आगामी चित्रपट पानीपतसाठी देखील त्याने खूप मेहनत घेतली. 


वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अर्जुन कपूर दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या पानीपत चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याने मराठी योद्धाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अर्जुन व्यतिरिक्त क्रिती सेनॉन व संजय दत्त मुख्य भूमिकेत होते.

Web Title: Arjun Kapoor shared old pic on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.