ठळक मुद्देहा फोटो त्याच्या फॅन्सना चांगला भावला आहेफॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

'इश्कजादे' सिनेमातून अर्जुन कपूरने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर त्याचे या सिनेमातील काम प्रेक्षकांना भावले. कमी कालावधीतच त्याने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या त्याच्याकडे बरेच सिनेमे आहेत. अर्जुन कपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असतो.  काही दिवसांपूर्वी अर्जुनने त्याचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला अर्जुनने एक कॅप्शनसुद्धा दिले आहे. अर्जुनच्या हा फोटो त्याच्या फॅन्सना चांगला भावला आहे. अर्जुनच्या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 


अर्जुन कपूर गेल्या अनेक महिन्यांपासून तो मलायका सोबतच्या लग्नांच्या चर्चेमुळे चर्चेत आला आहे. अर्जुन आणि मलायकाने त्यांचे नाते मीडियापासून का लपवले नाही याविषयी देखील अर्जुनने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. त्याने म्हटले होते की, आम्ही मीडियासमोर येण्याचा विचार केला कारण आम्हाला वाटलं, मीडिया आमच्या नात्याचा आदर करत आहे.  


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, सध्या अर्जुन कपूर आगामी सिनेमा 'पानीपत'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सिनेमाचे दिग्दर्शन आशुतोष करणार असून पानिपतच्या युद्धावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात संजय दत्त, क्रिती सॅनन, अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. अर्जुन कपूर यात मराठा योद्धा सदाशिवराव भाऊ पेशवे याची भूमिका साकारणार आहे.

तर बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीत आपले प्रस्थ निर्माण करणाऱ्या अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे पानिपत या चित्रपटात एका मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पानिपत या चित्रपटात पद्मिनी गोपिका बाई ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. ६ डिसेंबर रोजी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 


Web Title: Arjun kapoor share his childhood photo on instagram
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.