Ek Villain Returns Trailer : ये क्या हो रहा है...! ‘एक विलेन रिटर्न्स’चा ट्रेलर पाहून फॅन्स कन्फ्युज!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 06:09 PM2022-06-30T18:09:47+5:302022-06-30T18:11:24+5:30

Ek Villain Returns Trailer: जॉन अब्राहम व अर्जुन कपूरच्या ‘एक विलेन रिटर्न्स’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय.

arjun kapoor john abraham Ek Villain Returns Trailer out Twitter Reaction | Ek Villain Returns Trailer : ये क्या हो रहा है...! ‘एक विलेन रिटर्न्स’चा ट्रेलर पाहून फॅन्स कन्फ्युज!!

Ek Villain Returns Trailer : ये क्या हो रहा है...! ‘एक विलेन रिटर्न्स’चा ट्रेलर पाहून फॅन्स कन्फ्युज!!

googlenewsNext

Ek Villain Returns Twitter Reaction: जॉन अब्राहम  (John Abraham) व अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) ‘एक विलेन रिटर्न्स’ (Ek Villain Returns ) या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज  झालाय. ट्रेलरमधील जॉन व अर्जुनचा अ‍ॅक्शन अवतार चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. पण सोबत या ट्रेलरनं चाहत्यांचं कन्फ्युजनही वाढवलं आहे. काही चाहते कन्फ्युज आहेत आणि काही चाहत्यांची एक्साईटमेंट हा ट्रेलर बघून वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे.
सोशल मीडियावर ‘एक विलेन रिटर्न्स’चा ट्रेलर पाहून चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘एक विलेन रिटर्न्स’ हा चित्रपट 29 जुलैला रिलीज होतोय. या चित्रपटात जॉन व अर्जुनसोबत दिशा पाटनी व तारा सुतारिया लीड रोलमध्ये आहेत. मोहित सूरीने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

ये क्या हो रहा है...

‘एक विलेन रिटर्न्स’च्या ट्रेलरमध्ये मला केवळ एक गोष्ट पॉझिटीव्ह वाटली, ती म्हणजे काय सुरू आहे, हेच मला कळलं नाही. मोहित सूरीच्या अन्य चित्रपटांप्रमाणे या चित्रपटाच्या म्युझिकने मला आकर्षित केलं. पण ट्रेलरमधील स्टार्सची अ‍ॅक्टिंग पाहून मी चिंतीत झालो, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली.

रितेशचा फोटोनेच वाढवलं थ्रील

रितेश देशमुखच्या केवळ एका फोटोनं ट्रेलरला थ्रीलिंग बनवलं. ‘एक विलेन’मध्ये रितेशने शानदार काम केलं होतं. ट्रेलर ओव्हरऑल  चांगला आहे. यावेळी मोहित सूरीकडून अपेक्षा आहेत, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली.

ट्रेलर दमदार

एक विलेन रिटर्न्सचा ट्रेलर दमदार आहे. पाहून अंगावर काटा आला. अर्जुन कपूर आवडला आणि जॉनही, अशी प्रतिक्रिया अन्य एका चाहत्याने दिली.

जॉन हाच हायलाईट

एका युजरने लिहिलं, ट्रेलर इतका जबरदस्त असेल याची अपेक्षा नव्हती. जॉन अब्राहम हाच ट्रेलरचा हायलाईट आहे. मी तर चित्रपट पाहायला उत्सुक आहे.

‘एक विलेन रिटर्न्स’मध्ये हिरो व हिरोईनची नाही तर विलेनची कहाणी पाहायला मिळणार आहे. कहाणी एकदम वेगळी असणार आहे आणि स्टारकास्ट तर वेगळी आहेच. ‘एक विलेन’मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख व श्रद्धा कपूर लीड रोलमध्ये होते. यात रितेशने निगेटीव्ह  रोल केला होता. ‘एक विलेन रिटर्न्स’ हा त्याचाच सीक्वल आहे.

Web Title: arjun kapoor john abraham Ek Villain Returns Trailer out Twitter Reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.