Arjun Kapoor gets agitated after photographers block Malaika Arora's way | पापाराझींनी अडवला मलायका अरोराचा रस्ता! अर्जुन कपूर भडकला!!
पापाराझींनी अडवला मलायका अरोराचा रस्ता! अर्जुन कपूर भडकला!!

ठळक मुद्देअर्जुन कपूर सध्या आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानीपत’ या चित्रपटात बिझी आहे.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर व अभिनेत्री मलायका अरोरा सध्या कधी नव्हे इतके चर्चेत आहेत. जगाची पर्वा न करता दोघेही मुंबईच्या रस्त्यांवर, बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये अगदी खुल्लम खुल्ला फिरताना दिसतात. यादरम्यान अर्जुन कायम मलायकाची काळजी घेताना दिसतो. अशात मलायकाला कुणाचा त्रास होत असेल तर अर्जुन गप्प कसा बसेल. अलीकडे नेमके हेच झाले.
अर्जुन-मलायका मित्रांसोबत डिनर डेटवर निघाले. फोटोग्राफर्स जणू त्यांच्या मागावर असावेत. दोघेही एकत्र दिसताच,त्यांचे कॅमेरे सरसावलेत. याचदरम्यान फोटोग्राफर्सनी अजानतेपणी मलायकाचा रस्ता अडवून धरला. पापाराझींनी मलायकाचा रस्ता अडवलेला पाहून ऐरवी ‘कूल मार्इंडेड’ राहणारा अर्जुन कपूर भडकला. त्याने पापाराझींना चांगलेच फैलावर घेतले. मग काय, पापाराझींनी मलायकाचा मार्ग मोकळा केला आणि प्रकरण हाताबाहेर जाता जाता राहिले. यानंतर मलायका व अर्जुन दोघेही तिथून निघून गेलेत.


मलायका व अर्जुनचे नाते आताश: कुणापासूनही लपलेले नाही. दोघेही कायम एकत्र फिरताना दिसतात. हे कपल लवकरच लग्न करणार, असेही मानले जात आहेत. अर्थात दोघांनीही यावर चुप्पी साधली आहे.


कामाबद्दल बोलायचे तर अर्जुन कपूर सध्या आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानीपत’ या चित्रपटात बिझी आहे. याचित्रपटात संजय दत्त व क्रिती सॅननही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. याचवर्षी ६ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. ‘इंडियाज् मोस्ट वॉन्टेड’ आणि ‘संदीप और पिंकी फरार’ असे त्याचे दोन चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. मलायकाचे म्हणाल तर सध्या ती आपल्या गर्ल गँगसोबत पार्ट्या करण्यात आणि जिममध्ये घाम गाळण्यात बिझी आहे.


Web Title: Arjun Kapoor gets agitated after photographers block Malaika Arora's way
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.