अर्जुन कपूरनं खरेदी केली आणखी एक महागडी कार, किंमत ऐकून चक्रावून जाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 02:37 PM2021-09-08T14:37:45+5:302021-09-08T14:39:06+5:30

02911!! खास आहे अर्जुनच्या नव्या एसयुव्हीचा नंबर...

arjun kapoor buys expensive car Maybach GLS600 SUV of rupees 2.43 crore | अर्जुन कपूरनं खरेदी केली आणखी एक महागडी कार, किंमत ऐकून चक्रावून जाल 

अर्जुन कपूरनं खरेदी केली आणखी एक महागडी कार, किंमत ऐकून चक्रावून जाल 

Next
ठळक मुद्देअर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याचा ‘भूत पूलिस’ हा सिनेमा येत्या 10 सप्टेंबरला ओटीटीवर रिलीज होतोय.

बॉलिवूड सेलिब्रिटींजवळ जगातील एकापेक्षा एक महागड्या व अलिशान गाड्या आहेत. आता या यादीत अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याचं नावही समाविष्ट झालं आहे. मलायका अरोरासोबतच्या नात्यामुळं चर्चेत राहणा-या अर्जुननं आता एक महागडी कार खरेदी केली आहे. अर्जुनच्या या अलिशान लक्झरी कारची किंमत कोटींच्या घरात आहे.
अर्जुनकडे आधीच ऑडी क्यू 5, होंडी सीआर-व्ही, लँड रोव्हर, Maserati Levanteअशा महागड्या गाड्या आहेत. आता त्याने नवीकोरी Maybach GLS600 SUV ही गाडी खरेदी केली आहे. तिची किंमत 2.43 कोटी रूपये आहे. खास गोष्ट म्हणजे, अर्जुनच्या या नव्या एसयुव्हीचा नंबर. त्याच्या गाडीचा नंबर आहे 02911. हा नंबर अर्जुनसाठी खास आहे.

होय, कारण हा नंबर त्याची प्रिय बहिण अंशुलाचा बर्थ डे (29 डिसेंबर) व पापा बोनी कपूरचा बर्थ डे(11 नोव्हेंबर) यांचं कॉम्बिेनेशन आहे. अर्जुन कपूरआधी ही एसयुव्ही रणवीर सिंगने खरेदी केली होती आणि रणवीर या कारमध्ये अर्जुनला राईडवर घेऊन गेला होता. कदाचित तेव्हापासूनच ही कार घ्यायचीच असं अर्जुनने ठरवलं असावं. आता या नव्या को-या अलिशान एसयुव्हीमधून अर्जुन सर्वप्रथम कोणाला राईडवर नेतो, ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे.

अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याचा ‘भूत पूलिस’ हा सिनेमा येत्या 10 सप्टेंबरला ओटीटीवर रिलीज होतोय. यात अर्जुनसोबत सैफ अली खान, जॅकलिन फर्नांडिस व यामी गौतम मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय ‘एक विलन रिटर्न्स’ या सिनेमातही अर्जुनची वर्णी लागली आहे. यात जॉन अब्राहम, दिशा पाटणी व तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहेत.  

Web Title: arjun kapoor buys expensive car Maybach GLS600 SUV of rupees 2.43 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app