अर्जुन व अंशुलाने उचलला खारीचा वाटा,  1 कोटी उभे करत 30 हजार लोकांना दिला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 03:21 PM2021-04-30T15:21:23+5:302021-04-30T15:23:46+5:30

‘ही मदत फार मोठी नाही, हे मला माहित आहे. पण आम्ही थोडे बहुत करू शकलो, याचा मात्र आनंद आहे...‘

arjun kapoor and sister anshula kapoor raise 1 crore help for corona virus pandemic | अर्जुन व अंशुलाने उचलला खारीचा वाटा,  1 कोटी उभे करत 30 हजार लोकांना दिला मदतीचा हात

अर्जुन व अंशुलाने उचलला खारीचा वाटा,  1 कोटी उभे करत 30 हजार लोकांना दिला मदतीचा हात

googlenewsNext
ठळक मुद्दे‘इश्कजादे’ सिनेमातून अर्जुन कपूरने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर फार कमी काळात त्याने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले.

कोरोना महामारीच्या काळात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावलेत. अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor ) व त्याची बहीण अंशुला कपूर ( Anshula Kapoor) या भावंडांनी खारीचा वाटा उचलत 1 कोटी रूपये जमा केले. अर्जुन व अंशुलाने या 1 कोटी रूपयातून 30 हजार लोकांना मदत केली आहे.
ऑनलाइन सेलिब्रिटी फंडरेजिंग प्लॅटफॉर्म ‘फॅनकाइंड’च्या माध्यमातून या दोघांनी हे पैसे गोळा केले आहेत. अर्जुनने स्वत: याबद्दल माहिती दिली. (Arjun Kapoor and sister Anshula Kapoor raise 1 crore help for people)

अर्जुनने सांगितले, महामारीने सर्वांना दु:खाच्या दरीत ढकलले आहे. याच संकटाने आपणा सर्वांना एकमेकांची मदत करण्यास प्रोत्साहित केले आहे. अंशुला व मी फॅनकाइंडच्या मदतीने लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला. मला हे सांगताना आनंद होतोय की आम्ही या संकटकाळात 1 कोटी जमा केलेत आणि देशातील सुमारे 30 हजार लोकांना मदत केली. या पैशातून 30 हजार कुटुंबांना महिनाभराचे राशन वाटप केले गेले. काही स्थलांतरित प्रवाशांना आर्थिक मदत केली गेली. हायजीन किट्सचे वाटप केले गेले. 

ही मदत फार मोठी नाही, हे मला माहित आहे. पण आम्ही थोडे बहुत करू शकलो, याचा मात्र आनंद आहे. मी माझी आयुष्यभराची कमाई हा प्लॅटफॉर्म उभा करण्यासाठी लावली आहे, पण याद्वारे कठीण काळात मी लोकांची मदत करू शकतोय, याचा मला अभिमान आहे.
‘इश्कजादे’ सिनेमातून अर्जुन कपूरने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर फार कमी काळात त्याने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. सध्या अर्जुन कपूर मलायका अरोरासोबतच्या नात्यामुळेही चर्चेत आहे.

Web Title: arjun kapoor and sister anshula kapoor raise 1 crore help for corona virus pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.