फेक न्यूज पसरवणाऱ्या सोशल मीडिया युजर्सला अरबाज खानचा दणका, दाखल केला मानहानीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 04:43 PM2020-09-29T16:43:26+5:302020-09-29T16:44:47+5:30

जाणून घ्या काय आहे प्रकरण

arbaaz khans name dragged in death sushant singh rajput and disha salian actor take legal action | फेक न्यूज पसरवणाऱ्या सोशल मीडिया युजर्सला अरबाज खानचा दणका, दाखल केला मानहानीचा दावा

फेक न्यूज पसरवणाऱ्या सोशल मीडिया युजर्सला अरबाज खानचा दणका, दाखल केला मानहानीचा दावा

googlenewsNext
ठळक मुद्दे कोर्टाने या सर्वांना अरबाजविरोधातील सर्व पोस्ट हटवण्याचे आदेश दिले आहे. 

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अरबाजने काही अज्ञात सोशल मीडिया युजर्सविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणात नाव गोवल्याबद्दल अरबाजकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावर वाट्टेल ते आरोप करून आपल्याला बदनाम केले जात असल्याचा आरोप अरबाजने केला असून बॉम्बे सिव्हिल कोर्टात मानहानीचा दावा केला जात आहे.

काय आहे प्रकरण
दिशा व सुशांतच्या मृत्यूप्रकरणी फेसबुकसह काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील काही पोस्टमध्ये अरबाज खानवर गंभीर आरोप करण्यात आले होते. अरबाज हा सुशांत व दिशाच्या हत्येत भागीदार असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला होता. केवळ इतकेच नाही तर सुशांत व दिशा प्रकरणात अरबाजचा हात असल्याचे आढळल्याने सीबीआयने त्याला ताब्यात घेतल्याचेही या पोस्टमध्ये म्हटले गेले होते. प्रत्यक्षात असे काहीही नाही, हा सगळा प्रकार सहन न झाल्याने अरबाजने अखेर कायदेशीर कारवाई करत, साक्षी भंडारी आणि विभोर आनंद यांच्याह काही अज्ञात युजर्सविरोधात मानहानीचा दावा दाखल केला.
दरम्यान कोर्टाने या सर्वांना अरबाजविरोधातील सर्व पोस्ट हटवण्याचे आदेश दिले आहे. इतकेच नाही तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व अन्य माध्यमांवरील अरबाज व त्याच्या कुटुंबीयांविरोधातील अशा बदनामी करणा-या पोस्ट त्वरित डिलीट करण्याचेही कोर्टाने म्हटले आहे.

सुशांत प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले ते पाहिले; शरद पवारांचा टोला

सुशांतची हत्या की आत्महत्या?, व्हिसेरा रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा

सुशांतवर विषप्रयोग झाला नाही...

सुशांत  मृत्यूप्रकरणी एम्सच्या विशेष पथकाने आपला अहवाल सीबीआयकडे सादर केला आहे. या व्हिसेरा  रिपोर्टनुसार, सुशांत सिंह राजपूतवर कोणत्याही प्रकारचा विषप्रयोग करण्यात आला नव्हता. त्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे विषकण आढळले नसल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.  सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्याने, त्याच्यावर विषप्रयोग केला गेला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या तपासाकरिता AIIMSच्या डॉक्टरांचे एक विशेष पथक नेमण्यात आले होते. याच विशेष पथकाने सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट सादर केला आहे.

 

Web Title: arbaaz khans name dragged in death sushant singh rajput and disha salian actor take legal action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.