Arbaaz Khan's girlfriend Georgia keeps ex-wife following in Malaika's footsteps | अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया ठेवतेय एक्स वाइफ मलायकाच्या पावलांवर पाउल, करतेय ही गोष्ट

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया ठेवतेय एक्स वाइफ मलायकाच्या पावलांवर पाउल, करतेय ही गोष्ट

अभिनेत्री जर्जिया अँड्रियानी लवकरच श्रीदेवी बंगलो चित्रपटात अरबाज खान आणि प्रिया प्रकाश वॅरियर यांच्यासह चित्रपटात सरप्राईस एलिमेंट म्हणून दिसणार आहे. या चित्रपटात ती अरबाज खान आणि प्रिया प्रकाश वारीयर सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. यासोबतच ती आयटम साँग करताना दिसणार आहे.


श्रीदेवी बंगलो चित्रपटात जॉर्जिया झळकणार अशी सगळीकडे चर्चा होत होती. मात्र आता हे निश्चित झाले आहे. या चित्रपटात जॉर्जिया आयटम साँग करणार आहे. तिने आयटम साँगचे बिहाइंड सीन शेअर केले आहेत. 

श्रीदेवी बंगलो या चित्रपटातून जॉर्जिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात काम करण्याचे अनुभव सांगताना जॉर्जिया म्हणाली " कोरिओग्राफी शिकण्यापासून ते मनोरंजक वातावरणात शूटिंगपर्यंत मी संपूर्ण प्रक्रियेचा खूप आनंद घेतला आणि मला खात्री आहे की मुदस्सर खानची ही हुकअप स्टेप प्रेक्षकांना खूप आवडतील.

बॉलिवूडाच्या सर्वांत हॉट जोडयांपैकी एक असलेली अभिनेता अरबाज खान आणि त्याची इटालियन गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी यांची जोडी. मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाजचं जॉर्जियाशी नातं तयार झालं. मागील दोन वर्षांपासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Arbaaz Khan's girlfriend Georgia keeps ex-wife following in Malaika's footsteps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.