बॉलिवूडमधील बरीच कलाकार मंडळी दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करत आहेत. त्यात आता अभिनेता अरबाज खानदेखील दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करतो आहे. ही माहिती खुद्द त्यानेच सोशल मीडियावर दिली आहे. 

अभिनेता अरबाज खानने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, 'मी दिग्गज अभिनेते मोहनलाल व दिग्दर्शक सिद्दीकी सर यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. मी मल्याळम सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे नाव आहे बिग ब्रदर. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला जुलैमध्ये सुरूवात होणार आहे.'

अरबाजच्या बिग ब्रदर या चित्रपटाच्या कथानकाबद्दल व नायिका कोण असणार आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र अरबाजला मल्याळम सिनेसृष्टीत कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

अभिनेता अरबाज खान व मलायका अरोरा यांचे नाते मे २०१७ संपले. १९ वर्षे एकत्र संसार केल्यावर एका वळणावर अचानक अरबाज व मलायकाने एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पुढे कायदेशीर मार्गाने घटस्फोटही घेतला. आता दोघेही आपआपल्या आयुष्यात बरेच पुढे गेले आहेत.

एकीकडे मलायका अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. तर दुसरीकडे अरबाज विदेशी बाला जॉर्जियाच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे. मलायका व अर्जुन लवकरच लग्न करणार, असे मानले जात आहे. पण कदाचित मलायकाआधी अरबाज खान हाच लग्न करून मोकळा होणार, असे दिसतेय.


जॉर्जिया एंड्रियानी आणि अरबाज खानची लव्ह स्टोरी ही आता सगळ्या जगाला माहिती आहे. सध्या दोघे प्रेमाच्या अखंड सागरात बुडाले आहे.

दोघांना अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी आणि पार्टीमध्ये स्पॉट करण्यात आलेय.


Web Title: Arbaaz Khan Working in Big Brother Movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.