Arbaaz Khan is ready to work with Vivek Oberoi in horror film Rosie The Saffron chapter | काय सांगता! सलमान खानचा वैरी विवेक ओबेरॉयसोबत अरबाज खानची हातमिळवणी, फॅन्स झाले हैराण!

काय सांगता! सलमान खानचा वैरी विवेक ओबेरॉयसोबत अरबाज खानची हातमिळवणी, फॅन्स झाले हैराण!

बॉलिवूडमध्येसलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील वाद सर्वांनाच माहीत आहे. दोघांचा ३६ आकडा आहे आणि अनेक वर्षांपासून दोघेही एकमेकांशी बोलत नाही. इतकेच नाही तर ते कधी एकमेकांचं तोंडही बघत नाहीत. असं असलं तरी अरबाज खानने आपल्या भावाच्या सर्वात मोठ्या वैऱ्यासोबत म्हणजे विवेक ओबेरॉयसोबत हात मिळवणी केली आहे. दोघेही एकत्र काम करत आहेत.

BollywoodLife.com ने दिलेल्या एका रिपोर्टनुसार अरबाज खान आणि विवेक ओबेरॉय 'रोजी- द सॅफरन चॅप्टर' नावाच्या सिनेमात एकत्र काम करत आहेत. या हॉरर सिनेमाची निर्मिती देखील अरबाज खानने केली आहे. तर विवेकची यात मुख्य भूमिका आहे. विवेक ओबेरॉय आणि अरबाज खान यांच्या हातमिळवणीने सगळेच हैराण झाले आहेत. हा सिनेमा एक रिअल लाइफ बेस्ड कथेवर आधारित आहे. ज्यात श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी मुख्य भूमिकेत असेल.

सिनेमाची सहनिर्माता प्रेरणा अरोराने मीडियासोबत बोलताना सांगितले की, 'आम्हाला आनंद आहे की, आमच्या सिनेमात अरबाज खानची एन्ट्री झाली. तो कमाल निर्मात आणि दिग्दर्शक आहे. आम्ही हा सिनेमा सुरू करण्यासाठी फार उत्साही आहोत. अरबाज खानच्या येण्याने हा उत्साह अधिक वाढला आहे'.

या सिनेमाच्या कथेबाबत प्रेरणाने सांगितले की, 'रोजीची कथा एका १८ वर्षीय मुलीची आहे. जी अचानक गायब होते. ही एका सॅफरन नावाच्या कॉल सेंटरची खरी कहाणी आहे. सिनेमात मुलीच्या गायब होण्याची कथा आहे. ही मुलगी होती का किंवा तिचा मर्डर झालाय का किंवा अचानक गायब झाली? या प्रश्नांची उत्तरे सिनेमात असतील. रोजीची भूमिका पलक तिवारी साकारेल'.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Arbaaz Khan is ready to work with Vivek Oberoi in horror film Rosie The Saffron chapter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.