मलायकासोबतच्या घटस्फोटावर अरबाज खाननं तोडली चुप्पी, घटस्फोटाचं सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 08:24 PM2019-07-19T20:24:54+5:302019-07-19T20:25:54+5:30

अरबाज खान व मलायका अरोरा २०१७ साली विभक्त झाले.

arbaaz khan opens up about his equation with ex wife malaika arora post divorce | मलायकासोबतच्या घटस्फोटावर अरबाज खाननं तोडली चुप्पी, घटस्फोटाचं सांगितलं कारण

मलायकासोबतच्या घटस्फोटावर अरबाज खाननं तोडली चुप्पी, घटस्फोटाचं सांगितलं कारण

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराअरबाज खान बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल होते. त्यांनी लग्नाच्या १९ वर्षांनंतर एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अरबाज व मलायका त्यांच्या जीवनात पुढे वळले आहेत आणि वेगवेगळ्या लोकांना डेट करत आहेत. नुकतेच अरबाज खाननेमलायका अरोराबाबत वक्तव्य केले आहे. म्हणाला की, आम्ही घटस्फोटानंतरही एकमेकांचा आदर करतो. 

नुकत्याच डेक्कन क्रॉनिकलला वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अरबाज खानने आपली एक्स वाईफ मलायकासोबतच्या नात्याबद्दल सांगितलं. तो म्हणाला की, आम्ही बरेच वर्ष एकत्र राहिलो आणि आमच्या खूप साऱ्या आठवणी आहे. आमची मुलं ही सर्वात खास बाब आहे. त्यामुळे एकमेकांप्रती आमच्यात आदर आहे. असं काही होतं आमच्यात ज्यामुळे आम्ही विभक्त झालो. याचा अर्थ हा नाही की आम्ही एकमेकांचा द्वेष करतो. आम्ही मॅच्युएर आहोत. आम्ही आदराने सर्व गोष्टी करत आहोत.


अरबाजने मलायकाच्या कुटुंबासोबतच्या नात्याबद्दल सांगितलं. त्याने सांगितलं की, माझं मलायकाच्या कुटुंबासोबत खूप चांगले संबंध आहे. आम्ही एकत्र प्रेमानं एका छताखाली राहू शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आमची मुलं आमच्यावर निर्भर आहेत. ते मोठे झाले की सर्वकाही ठीक होईल.


मलायका अरोरा व अरबाज खानने १९९८ साली प्रेमविवाह केला होता. २००२ साली मलायकाने अरहानला जन्म दिला. २०१६ साली त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि ११ मे, २०१७ साली ते विभक्त झाले.

आता अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करतोय. तर मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये आहे.

Web Title: arbaaz khan opens up about his equation with ex wife malaika arora post divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.