ar rahman fan shows love for music directer on social media special way | त्याने चक्क आपल्या नव्या कोऱ्या कारला दिले ए.आर. रहमानचे नाव!!
त्याने चक्क आपल्या नव्या कोऱ्या कारला दिले ए.आर. रहमानचे नाव!!

ठळक मुद्देए.आर. रहमानबद्दल सांगायचे झाल्यास, लवकरच तो प्रोड्यूसर म्हणून दिसणार आहे

सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक ए. आर. रहमान गत दोन दशकांपासून फिल्म इंडस्ट्रीत आहे. हिंदी सिने संगीतातील मैलाचा दगड असलेल्या ए आरने संगीताचा ट्रेन्डच बदलला. त्याच्या संगीताने देशालाच नव्हे तर अख्ख्या जगाला वेड लावले. साहजिकच, ए. आर रहमानची फॅन फॉलोर्इंग मोठी आहे. त्याचा साधा सरळ स्वभाव आणि त्याच्या जादुई संगीताची लोकांमध्ये जबरदस्त के्रज आहे. अलीकडे असेच एक उदाहरण पाहायला मिळाले. एका चाहत्याने ए. आर. रहमानच्या प्रेमाखातर काय करावे, तर चक्क आपल्या गाडीलाच त्याने ए.आर.चे नाव दिले.


होय, या चाहत्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने आपल्या नव्या कारचा फोटो शेअर केला आहे. या कारवर त्याने ‘आय लव्ह एआरआर’ असे लिहिले आहे. चंदर असे या चाहत्याचे नाव आहे. हा फोटो शेअर करताना चंदरने लिहिलेले कॅप्शनही भावूक करणारे आहे. ‘ए. आर. रहमान मी तुझा सर्वात मोठा चाहता आहे. आज मी माझी ड्रीम कार खरेदी केली. माझ्या ड्रिम कारवर मी ज्याला आदर्श मानतो, त्याचे नाव असावे, अशी माझी इच्छा होती. आज ती पूर्ण झाले. आपल्या संगीताने माझे आयुष्य बदलण्यासाठी आभार...,’ असे त्याने लिहिले आहे.
ए.आर. रहमानबद्दल सांगायचे झाल्यास, लवकरच तो प्रोड्यूसर म्हणून दिसणार आहे. ‘99 सॉन्ग्स’ नामक रोमॅन्टिक म्युझिक चित्रपट तो प्रोड्यूस करणार आहे. या चित्रपटातून अभिनेता एहान भट आपल्या डेब्यू करतेय. येत्या २१ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


Web Title: ar rahman fan shows love for music directer on social media special way
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.