Anushka Shetty turns up the heat with her stunning look | अनुष्का शेट्टीचे हे फोटो बघून तुम्हीही म्हणाल, बघताच ही बाला कलेजा खल्लास झाला
अनुष्का शेट्टीचे हे फोटो बघून तुम्हीही म्हणाल, बघताच ही बाला कलेजा खल्लास झाला

ठळक मुद्दे२००५ मध्ये तेलगू सिनेमा सुपरमधून तिने पदार्पण केले होतेअनुष्का सोबत या सिनेमात आर माधवन दिसणार आहे

अनुष्का शेट्टीने भागमतीनंतर सायलेन्स सिनेमा साईन केला आहे. अनुष्काने काही वेळा पूर्वीच सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. याफोटोमध्ये अनुष्का भलतीच सुंदर दिसते आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. रिपोर्टनुसार काही महिन्यांपासून अनुष्का आपले वजन कमी करण्यासाठी चांगलीच मेहनत घेत आहे. २००५ मध्ये तेलगू सिनेमा सुपरमधून तिने पदार्पण केले होते. त्यानंतर २०१५ मध्ये साईझ झिरो या आणखी एका तेलगू सिनेमासाठी तिला तब्बल २० किलो वजन वाढवायला लागले होते. त्यानंतर मात्र तिने मनावर घेऊन चांगलेच वजन कमी केल्याचा अंदाज आपल्याला फोटो पाहून येतो आहे. 


अनुष्काने वजन कमी करण्यासाठी नॉर्वेमधील न्यूट्रॉपॅथीची ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली आहे. अनुष्काच्या मेहनतीला फळ आले असेच म्हणावे लागेल. अनुष्काचे लाइफस्टाइल कोच ल्युक कोन्टिनोने सुद्धा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोंमध्ये अनुष्का तिशय सुंदर दिसते आहे. तिने वजन कमी केल्यावर तिच्यात झालेले बदल खरचं पाहण्यासारखा आहे. 
येत्या आठवड्यापासून ती सायलेन्स सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन हेमंत मधुरकर करता येत. या सिनेमाव्दारे ती दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. अनुष्का सोबत या सिनेमात आर माधवन दिसणार आहे. रेंडू सिनेमानंतर पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


Web Title: Anushka Shetty turns up the heat with her stunning look
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.