anushka sharma and virat kohli does not have any servant at home | काय सांगता? अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या घरी नाही एकही नोकर, पाहुण्यांना स्वत: वाढतात जेवण

काय सांगता? अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या घरी नाही एकही नोकर, पाहुण्यांना स्वत: वाढतात जेवण

ठळक मुद्देविराट व अनुष्काच्या घरी गेल्या 11 जानेवारीला कन्यारत्न जन्मले. आपल्या मुलीचे त्यांनी वामिका असे नामकरण केले आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे एक स्टार कपल. अनुष्का तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते तर विराट कोहली त्याच्या काहीशा तापट स्वभावासाठी. प्रत्यक्षात हे कपल कसे आहे तर अगदी डाऊन टू अर्थ. होय, नाव, पैसा, ग्लॅमर असे सगळे काही असूनही या कपलचे पाय जमिनीवर आहेत. हे आम्ही नाही तर माजी क्रिकेटपटू शरणदीप सिंह यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. होय, विराट व अनुष्काच्या घरी नोकर नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

शरणदीप सिंह यांनी सांगितले, ‘अनुष्का व विराटच्या घरी मी नेहमीच जातो. त्यांच्या घरी कोणताच नोकर नाही. मी घरी जातो तेव्हा अनुष्का व विराट दोघेही आपल्या हाताने मला वाढतात. यापेक्षा आणखी काय हवे? विराट व अनुष्का तुमच्यासोबत बसतात, गप्पा करतात. तुमच्यासोबत डिनरसाठी बाहेर जातात. हेच तर हवे असते. ते दोघेही खूप डाऊन टू अर्थ आहेत.’

विराट व अनुष्काच्या घरी गेल्या 11 जानेवारीला कन्यारत्न जन्मले. आपल्या मुलीचे त्यांनी वामिका असे नामकरण केले आहे. विराट व अनुष्का यांच्याप्रमाणे मुलीचं नावही खास आहे. वामिकाचे नाव विराट व अनुष्का या दोघांच्या नावाला जोडून ठेवण्यात आले आहे. यात विराटचा ‘व’ आणि अनुष्काचा ‘का’ याचा समावेश आहे. वामिकाचा अर्थ होतो देवी दुर्गा... हे नाव दुर्गा देवीच्या नावापैकी एक आहे. विराट आणि अनुष्का यांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी दोघे जाहिरातीचे शूटिंग करत होते. त्यापूर्वी विराटने कोणत्या अभिनेत्रीसोबत काम केले नव्हते. त्यामुळे तो सेटवर अनुष्का शर्मासमोर खूप नर्व्हस झाला होता.
या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान विराट आणि अनुष्कामध्ये फ्रेंडशीप झाली आणि मग ते दोघे एकमेकांना भेटू लागले. काही कालावधीपर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केले आणि 2017 साली दोघांनी इटलीत लग्न केले.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: anushka sharma and virat kohli does not have any servant at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.