anurag kashyap asks narendra modi how to deal with his supporter who threatens his daughter |  मुलीला मिळाली रेपची धमकी; अनुराग कश्यपने स्क्रिनशॉट शेअर करत, मोदींना केला हा सवाल!
 मुलीला मिळाली रेपची धमकी; अनुराग कश्यपने स्क्रिनशॉट शेअर करत, मोदींना केला हा सवाल!

ठळक मुद्देतूर्तास अनुराग ‘सांड की आंख’ हा चित्रपट प्रोड्यूस करतो आहे.

अनुराग कश्यप हा परखड बोलणारा दिग्दर्शक़ वास्तववादी चित्रपट बनवणाºया अनुरागच्या चित्रपटांचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. राजकारणापासून सामाजिक मुद्यांवर बेधडक मत मांडणारा अनुराग आपल्या या स्वभावामुळे अनेकदा ट्रोल होतो. पण अनेकदा ट्रोलर्स आपल्या सर्व मर्यादा ओलांडतांना दिसतात. सध्या एका ट्रोलरने अशाच सर्व मर्यादा लांघत अनुरागच्या मुलीला अतिशय अश्लिल भाषेत धमकी दिली आहे. 
दरम्यान या ट्रोलरने लिहिलेल्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट शेअर करत,  अनुरागने नरेंद्र मोदी यांचे याकडे लक्ष वेधले आहे. माझ्या मुलीला धमक्या देत तुमच्या विजयाचा आनंद साजरा करणा-या समर्थकांशी तुम्ही कसे निपटणार, प्लीज मला सांगा, असे ट्वीट अनुरागने केले आहे.
अनुराग कश्यप अनेकदा मोदी सरकारविरोधात बोलताना दिसतो. त्यामुळे काल गुरुवारी भाजपाला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मोदी समर्थकांनी लगेच अनुरागला ट्रोल करणे सुरु केले. याचदरम्यान स्वत:ला मोदी समर्थक म्हणवणा-या एका युजरने थेट अनुरागच्या मुलीला लक्ष्य करत, तिला अतिशय अश्लिल भाषेत धमकी दिली. अनुरागच्या मुलीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर कमेंट करताना मोदी समर्थक म्हणवणाºया या युजरने धमकीवजा अश्लिल कमेंट लिहिली. अनुरागने या धमकीच्या ट्वीटचे स्क्रीनशॉट शेअर करत, थेट नरेंद्र मोदी यांचे या सगळ्याकडे लक्ष वेधले. नरेंद्र मोदी सर, विजयाच्या शुभेच्छा. पण  माझ्या मुलीला धमक्या देत या विजयाचा आनंद साजरा करणा-या तुमच्या समर्थकांशी कसे निपटता येईल. कारण मी तुमचा विरोधक आहे,’असे ट्वीट अनुरागने केले.त्याच्या या ट्वीटनंतर अनेकंदानी त्याला सायबर सेलकडे यासंदर्भात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. तूर्तास अनुराग ‘सांड की आंख’ हा चित्रपट प्रोड्यूस करतो आहे.


Web Title: anurag kashyap asks narendra modi how to deal with his supporter who threatens his daughter
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.