याला दान नाही, वाटप म्हणतात...! त्या ट्विटनंतर ट्रोल झालेत किरण आणि अनुपम खेर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 11:13 AM2021-04-28T11:13:15+5:302021-04-28T11:13:42+5:30

anupam kher and kirron kher gets brutally trolled : किरण व त्यांचे पती अनुपम खेर या दांम्पत्याने सोशल मीडियावर एक पत्र शेअर केले आणि यानंतर दोघेही जबरदस्त ट्रोल झालेत.

anupam kher and kirron kher gets brutally trolled as they called mp fund allocation as donation | याला दान नाही, वाटप म्हणतात...! त्या ट्विटनंतर ट्रोल झालेत किरण आणि अनुपम खेर

याला दान नाही, वाटप म्हणतात...! त्या ट्विटनंतर ट्रोल झालेत किरण आणि अनुपम खेर

googlenewsNext
ठळक मुद्दे किरण खेर यांना मल्टिपल मायलोमा झाल्याचे निदान झाले होते. हा एक प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे.

अभिनेत्री व चंदीगडच्या भाजपा खासदार किरण खेर (Kirron Kher) सध्या ब्लड कॅन्सरशी लढत आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पण तूर्तास किरण व त्यांचे पती अनुपम खेर (Anupam Kher) हे दोघे एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहेत. होय, या दांम्पत्याने सोशल मीडियावर एक पत्र शेअर केले आणि यानंतर दोघेही जबरदस्त ट्रोल झालेत. (Anupam Kher and Kirron Kher gets brutally trolled )
किरण खेर यांनी या पत्रात चंदीगडचे डेप्युटी कमिशनर मंदीप सिंह बराड यांना खासदार निधीतील 1 कोटी रूपयातून चंदीगडमध्ये कोव्हिड रूग्णांसाठी व्हेंलिटर खरेदी करण्याची विनंती केली. हे पत्र ट्विट करताना किरण खेर यांनी कॅप्शनमध्ये जे काही लिहिले ते वाचून लोकांनी त्यांना ट्रोल करणे सुरु केले.

म्हणे दान...


मी मनापासून आपल्या खासदार निधीतून 1 कोटी रूपये पीजीआय चंदीगडला दान देतेय. जेणेकरून कोव्हिड रूग्णांसाठी ताबडतोब व्हेंटिलेटर खरेदी केली जाऊ शकेल. मी चंदीगड व येथील जनतेसोबत खंबीरपणे उभी आहे, असे त्यांनी लिहिले. यातील ‘दान’ हा शब्द लोकांना आवडला नाही.
किरण यांचे हे ट्विट अनुपम यांनीही रिट्विट केले. लोकांनी त्यांनाही फैलावर घेतले.

लोकांनी केले ट्रोल


लोकांचा पैसा, लोकांसाठीच खर्च करण्याला दान म्हणत नाही, असे लोकांनी त्यांना सुनावले. अनेक सोशल मीडिया युजर्सनी किरण व अनुपम यांना तुम्ही स्वत:च्या खिशातून किती दान केलेत, असा सवालही केला. किरण यांच्याशिवाय अनुपम खेर यांनाही लोकांनी जबरदस्त ट्रोल केले.

गेल्या वर्षी 11 नोव्हेंबरला किरण खेर यांना चंदीगड येथील राहत्या घरी डाव्या हाताला दुखापत झाली होती. चंदीगडच्या पोस्ट ग्रॅच्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिचर्स येथे त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या गेल्या होत्या. यावेळी त्यांना मल्टिपल मायलोमा झाल्याचे निदान झाले होते. हा एक प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे. हा कॅन्सर त्यांच्या डाव्या हातापासून उजव्या खांद्यापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे गेल्या 4 डिसेंबरला त्यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले होते.

Read in English

Web Title: anupam kher and kirron kher gets brutally trolled as they called mp fund allocation as donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.