भजनसम्राट अनुप जलोटा ‘सांताक्लॉज’ बनतात तेव्हा...; पाहा पार्टीचे मजेशीर व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 11:12 AM2019-12-25T11:12:05+5:302019-12-25T11:14:28+5:30

भजनसम्राट अनुप जलोटा यांच्या घरीही ख्रिसमस पार्टी रंगली. पण अनुप जलोटांची ही पार्टी अनेकार्थाने खास ठरली.

anup jalota celebrates christmas as santa claus singing jingle bell in desi avtar video viral | भजनसम्राट अनुप जलोटा ‘सांताक्लॉज’ बनतात तेव्हा...; पाहा पार्टीचे मजेशीर व्हिडीओ

भजनसम्राट अनुप जलोटा ‘सांताक्लॉज’ बनतात तेव्हा...; पाहा पार्टीचे मजेशीर व्हिडीओ

googlenewsNext
ठळक मुद्दे‘बिग बॉस 12’मुळे अनुप जलोटा अचानक चर्चेत आले होते.

नाताळ सणामुळे देशभर उत्साहाचे वातावरण आहे. ठिकठिकाणची रंगीत विद्युत रोषणाई, सजवलेले ख्रिसमस ट्री, केकची चव, सगळ्यांचा आवडता सांता आणि जिंगल बेलचे स्वर असा सगळा माहोल आहे. बॉलिवूडमध्येही नाताळची धूम आहे. करिना कपूर, अर्पिता खान अशा अनेकांच्या घरी ख्रिसमस पार्टीचे आयोजन करण्यात आले. भजनसम्राट अनुप जलोटा यांच्या घरीही ख्रिसमस पार्टी रंगली. पण अनुप जलोटांची ही पार्टी अनेकार्थाने खास ठरली. होय, ही पार्टी त्यांनी आपल्या खास अंदाजात साजरी केली.


पार्टीत अनुप जलोटा सांताक्लॉज बनून सामील झाले. लोकांसोबत मिळून त्यांनी केक कापला. इतकेच नाही तर पार्टीतील पाहुण्यांना मस्तपैकी गाणीही ऐकवली. जिंगल बेल... जिंगल बेल... हे गीत त्यांनी खास देसी अंदाजात सादर केले आणि सगळेच अवाक झालेत. या पार्टीतील त्यांचे काही व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.


‘बिग बॉस 12’मुळे अनुप जलोटा अचानक चर्चेत आले होते. अनुप जलोटांनी त्यांची शिष्या जसलीन मथारूसोबत ‘बिग बॉस 12’च्या घरात प्रवेश घेतला होता. हा प्रवेश घेताना आम्ही दोघेही तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत, हे नॅशनल टीव्हीवर सांगून अनुप व जसलीन यांनी खळबळ उडवून दिली होती.

अर्थात अनुप जलोटा बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर त्यांनी जसलीनसोबतच्या रिलेशनशिपचा इन्कार केला होता. ते केवळ एक नाटक होते. बिग बॉससाठी रचलेले नाटक होते, असे त्यांनी सांगितले होते.  जसलीननेही नेमका हाच सूर आळवला होता. अनुप जलोटांसोबतचे रिलेशनशिप केवळ एक प्रैंक होते, असे तिने सांगितले होते.

Web Title: anup jalota celebrates christmas as santa claus singing jingle bell in desi avtar video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.