सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किडची चलती आहे. त्यात जान्हवी कपूर, सारा अली खान, ईशान खट्टर, अनन्या पांडे, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर व प्रनुतन बहल याशिवाय काही कलाकारांचा समावेश आहे. या स्टार किड्सनंतर आता आणखीन एक स्टार किड बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. ही स्टार किड म्हणजे प्रसिद्ध भजन गायक गुलशन कुमार यांची मुलगी खुशाली कुमार. ती आर. माधवनसोबत झळकणार आहे. 

टाईम्स नाऊच्या रिपोर्ट्सनुसार, गुलशन कुमार यांची मुलगी खुशाली कुमार लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. या चित्रपटाचं नाव दही चिनी असं आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आर. माधवन झळकणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला पुढील महिन्यात सुरूवात होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अश्विन नील मणी करणार आहेत. ही माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर दिली. त्यांनी या चित्रपटाचं पोस्टरही शेअर केलं आहे.   

या पोस्टरमध्ये माधवन आणि खुशालीही दिसत आहेत. फोटोमध्ये माधवन हसताना दिसत आहे यात त्याने पिंक कलरचा शर्ट आणि व्हाईट टी शर्ट घातला आहे. तर खुशाली त्याच्या डोक्यावर हात ठेवून उभी असलेली दिसत आहे. फोटोमध्ये खुशालीने ब्लू कलरचा कट-स्लीव्हस ब्लाऊज आणि सुंदर साडी नेसली आहे. तिने न्यूड मेकअपसोबत ब्लॅक कलरची छोटी टिकली लावली आहे. यात खुशाली खूपच सुंदर दिसत आहे.

तर पोस्टरमध्ये मागे भोपाळ न्यायालय दिसत आहे. 


खुशाली ही भजन गायक गुलशन कुमार यांची मुलगी आहे. गुलशन कुमार यांना तीन मुलं आहेत. दोन मुली तुलसी कुमार आणि खुशाली कुमार आणि एक मुलगा भूषण कुमार.

खुशाली सोशल मीडियावर सक्रीय असून ती नेहमी ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

इन्स्टाग्रामवर तिचे ४ लाख ६३ हजार फॉलोअर्स आहेत. 


Web Title: Another Star Kid to Make Bollywood Debut With Madhavan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.