अमृता रावने आरजे अनमोलशी गुपचूप केले होते लग्न, हटके आहे त्यांची प्यारवाली लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 02:53 PM2021-05-15T14:53:42+5:302021-05-15T14:53:54+5:30

अमृता ही बॉलिवूड अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने स्वत: ला नेहमीच वादांपासून दूर ठेवले आहे.

Anniversary special amrita rao tied knot with rj anmol in a secret marriage in 2016 | अमृता रावने आरजे अनमोलशी गुपचूप केले होते लग्न, हटके आहे त्यांची प्यारवाली लव्हस्टोरी

अमृता रावने आरजे अनमोलशी गुपचूप केले होते लग्न, हटके आहे त्यांची प्यारवाली लव्हस्टोरी

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao )  वीरची आई झाली आहे आणि ती पती आरजे अनमोल  (RJ anmol) सोबत आपले वैवाहिक जीवन आनंदाने जगतेय. अमृता ही बॉलिवूड अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने स्वत: ला नेहमीच वादांपासून दूर ठेवले आहे. अमृता हिट अभिनेत्री आहे जिचे नाव कोणत्याही अभिनेत्यासोबत जोडले गेले नाही पण शाहिद कपूरच्या खूप जवळ होती. पण या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना अफवा असल्याचे सांगितले. अमृताने आरजे अनमोलवर प्रेम केले आणि त्याच्याशी लग्नही केले. अमृता आणि आरजे त्यांच्या रोमँटिक बॉन्डमुळे इंडस्ट्रीमधील ते क्युट कपलपैकी एक आहेत. 

अमृता व अनमोलची भेट एका मुलाखतीदरम्यान झाली होती. या मुलाखतीनंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. लग्नाच्या दोन वर्षांपूर्वी अनमोलला डेंग्यू झाला होता. याचदरम्यान दोघांची मैत्री प्रेमात बदलली. 15 मे 2016मध्ये अमृताने आरजे अनमोलशी गुपचूप लग्न केले. लग्नापूर्वी अमृता व अनमोल 7 वर्षे डेटींग करत होते. अर्थात अमृताने हे सगळे दडवून ठेवले.

अमृताने 2002 मध्ये ‘अब के बरस’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. यांनतर ती ‘द लीजेंड ऑफ भगत सिंह’मध्ये दिसली होती. पण अमृताला खरी ओळख शाहिद कपूरसोबतच्या ‘इश्क विश्क’ आणि ‘विवाह’ या चित्रपटाने दिली. अमृता रावची इमेज ‘गर्ल - नेक्स्ट -डोर’अशीच बनून राहिली. आपल्या करिअरमध्ये ती कुठल्याही विवादात अडकली नाही. पण अशी एक वेळ आली की, करिना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या ब्रेकअपसाठी अमृता जबाबदार असल्याची चर्चा झाली.

 

Web Title: Anniversary special amrita rao tied knot with rj anmol in a secret marriage in 2016

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.