बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन व अभिनेत्री जया बच्चन यांचा आज ४६ वा लग्नाचा वाढदिवस आहे. या निमित्ताने अभिषेक बच्चनने त्या दोघांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अभिषेकने लिहिले की, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला दोघांना माझ्याकडून खूप सारे प्रेम. ४६ वर्षे झाले अजनूही हा प्रवास सुरू आहे. या निमित्ताने जाणून घ्या अमिताभ बच्चनजया बच्चन यांची लव्हस्टोरी...

जया बच्चन बऱ्याच कालावधीपासून बॉलिवू़डपासून दूर आहेत. २००१ साली अमिताभ बच्चन व जया बच्चन एकत्र स्क्रीनवर झळकले होते. ते दोघे कभी खुशी कभी गम सिनेमात झळकले होते. त्यानंतर आता त्यांच्या चाहत्यांना ते एकत्र पहायला मिळाले नाही.


सिमी गरेवाल यांचा चॅट शो रेन्डझवसमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांची व जया यांच्या पहिली मुलाखत व लव्हस्टोरीबद्दल सांगितले होते. अमिताभ बच्चन यांनी जया यांना पहिल्यांदा एका मासिकाच्या मुखपृष्ठावर पाहिले होते. मासिकावर जया यांना पाहून अमिताभ बच्चन खूप इंप्रेस झाले होते.


अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते की, त्यांना नेहमीच अशी मुलगी हवी होती जी आतून ट्रेडिशनल व बाहेरून मॉडर्न असेल. जया तशीच होती. अमिताभ बच्चन यांनी पुढे म्हटले की, जया यांचे डोळे त्यांना खूप सुंदर वाटतात. काही कालावधीनंतर दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी गु़ड्डी चित्रपटाची स्क्रीप्ट घेऊन बिग बींकडे आले.


अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपट जया यांना कास्ट करण्यात आले. अमिताभ, जया यांच्यासोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक होते. जया यांनी सांगितले की, हे पहिल्या नजरेतील प्रेम नव्हते. १९७० साली त्यांनी अमिताभ यांना पहिल्यांदा पुणे फिल्म इंस्टिट्युटमध्ये पाहिले होते. तिथे ते फिल्ममेकर के. अब्बास व त्यांच्या संपूर्ण ग्रुपसोबत तिथे पोहचले होते. अमिताभ यांची पर्सनॅलिटी जया यांना खूपच भावली होती. त्यावेळी अमिताभ बच्चन स्ट्रगल करत होते. मात्र त्यावेळी जया बच्चन या स्टार होत्या. त्यानंतर जेव्हा त्या दोघांची भेट गुड्डी चित्रपटाच्या सेटवर झाली तेव्हा ते खूप चांगले मित्र बनले होते. 


गुड्डीनंतर त्या दोघांनी एकत्र एक नजर चित्रपटात काम केले. त्यानंतर त्या दोघांच्या प्रेमकथेला सुरूवात झाली होती. जंजीर चित्रपटानंतर त्या दोघांच्या प्रेमकथेत एक ट्विस्ट आला. दोघांच्या कॉमन मित्राने सांगितले की जक हा सिनेमा हिट झाला तर आपण सगळे लंडनला फिरायला जाऊ. 


ज्यावेळी अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांना ही गोष्ट माहित पडली त्यावेळी त्यांनी दोघांना एकत्र पाठवण्यास मनाई केली. त्यांचे म्हणणे होते की अमिताभ बच्चन लग्न न करता कोणत्याही मुलीसोबत बाहेर फिरायला जाणार नाही. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी जया यांना लग्नासाठी प्रपोझ करण्याचा विचार केला.


अमिताभ यांनी प्रपोझ केल्यानंतर जया यांनी त्यांना होकार देण्यास वेळ घेतला नाही. त्या दोघांच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला. ३ जून, १९७३ साली ते दोघे विवाहबंधनात अडकले.

लग्न झाले त्याच दिवशी ते लंडनला फिरायला गेले. या लग्नाला अमिताभ व जया बच्चन यांचे नातेवाईक व मित्रमंडळी उपस्थित होते. 
 


Web Title: Anniversary Special: Amitabh Bachchan and Jaya Bachchan's love story had started this, see their photos.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.