अनिल कपूर दुखण्याने बेजार!! जर्मनीत होणार उपचार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 12:40 PM2019-01-29T12:40:37+5:302019-01-29T12:50:19+5:30

होय, अनिल यांना एका आजाराने ग्रासले आहे. या आजाराच्या उपचारासाठी अनिल लवकरच जर्मनीला रवाना होणार आहेत.अलीकडे एका मुलाखतीत खुद्द अनिल कपूर यांनी याबाबतचा खुलासा केला.

anil kapoor reveals about his illness and to head towards germany for treatment | अनिल कपूर दुखण्याने बेजार!! जर्मनीत होणार उपचार!!

अनिल कपूर दुखण्याने बेजार!! जर्मनीत होणार उपचार!!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटात अनिल कपूर व सोनम कपूर ही बापलेकीची जोडी प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहे.

अनिल कपूर यांचा आगामी चित्रपट ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. पण त्यापूर्वी अनिल कपूरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. होय, अनिल यांना एका आजाराने ग्रासले आहे. या आजाराच्या उपचारासाठी अनिल लवकरच जर्मनीला रवाना होणार आहेत.अलीकडे एका मुलाखतीत खुद्द अनिल कपूर यांनी याबाबतचा खुलासा केला.
मिड डेला दिलेल्या खास मुलाखतीत अनिल यांनी आपल्या आजाराबद्दल सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून माझ्या उजव्या हाताच्या खांद्यात कॅल्शिअम जमा झाले आहेत. यामुळे माझे खांदे जाम झाले आहेत. याच्या उपचारासाठी मला जर्मनीला जावे लागेल. तेथे डॉ. मुलर वॉल्फहार्ट माझ्यावर उपचार करतील. खांदे जाम झाल्याने अ‍ॅक्शन सीन्स करताना मला प्रचंड वेदना होतात. त्यामुळे मला लवकरात लवकर याचा इलाज करावा लागेल,असे त्यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी अनिल याच आजाराने त्रस्त झाले होते. त्यांच्या पायाच्या तळव्याने काम करणे बंद केले होते. त्यावेळी डॉ. मुलर यांनीच त्यांच्यावर उपचार केले होते.


‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटात अनिल कपूर व सोनम कपूर ही बापलेकीची जोडी प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहे. अनिल व सोनमशिवाय जुही चावला, राजकुमार राव यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. एका बोल्ड विषयावर आधारित हा सिनेमा येत्या १ फेबु्रवारीला रिलीज होतोय. ट्रेलर पाहता हा चित्रपट एलजीबीटीक्यू कम्युनिटीवर आधारित असल्याचे भासतेय. यात सोनम लेजबियनची भूमिका साकारते आहे. शैली चोप्राने हा चित्रपट दिग्दर्शित केलाय.

Web Title: anil kapoor reveals about his illness and to head towards germany for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.